India Vs Pakistan T20 Live : भारत-पाकिस्तान सामना झालाच नाही, तर...? जाणून घ्या Point Table वर कसा होईल परिणाम

IND Vs PAK Live T20 Scoreboard : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान यांच्यातला महामुकाबला मेलबर्नवर होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या हवामानाचा लहरीपणा सर्वांनाच चांगला माहित्येय.. त्यामुळे तीन तासांपूर्वी व्यक्त केलेला अंदाज क्षणात बदलूही शकतो. अशात जर भारत-पाकिस्तान सामना झालाच नाही तर...?

IND Vs PAK Live T20 Scoreboard : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आज भारत-पाकिस्तान यांच्यातला महामुकाबला मेलबर्नवर होणार आहे. पावसानेही माघार घेतल्याने हा सामना होण्याची शक्यता बळावली आहे. पण, ऑस्ट्रेलियाच्या हवामानाचा लहरीपणा सर्वांनाच चांगला माहित्येय.. त्यामुळे तीन तासांपूर्वी व्यक्त केलेला अंदाज क्षणात बदलूही शकतो. अशात जर भारत-पाकिस्तान सामना झालाच नाही तर...?

भारत-पाकिस्तान देशांतील संबंध पाहता क्रिकेट मॅचमध्ये नेहमीच तणावाचं वातावरण असे आणि मैदानावरच नव्हे तर प्रेक्षकांमध्येही तो तणाव पाहायला मिळाला आहे. मेलबर्नवर होणारा सामना पाहण्यासाठी लाखाहून अधिक प्रेक्षक येणार आहेत व त्यात भारतीयांची संख्या ही ७० हजाराच्या आसपास आहे. दुपारी १.३० वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या सामन्यासाठी आतापासूनच दोन्ही देशांचे चाहते मेलबर्न स्टेडियमवच्या बाहेर जमू लागले आहेत.

भारत-पाकिस्तान सामना म्हणजे बाबर आजम व विराट कोहली यांच्यातली ठसन आलीच. मागील काही वर्षांत बाबरने भारताच्या स्टार फलंदाजाचे अनेक विक्रम मोडले आणि त्यामुळे त्याची तुलना विराटचा कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून होतेय. शाहीन शाह आफ्रिदीने मागील वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाची वाट लावली होती आणि यंदा त्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी रोहित शर्मा व लोकेश राहुल सज्ज आहेत.

सूर्यकुमार यादव हा टीम इंडियाचा X Factor पाकिस्तानची डोकेदुखी वाढवू शकतो. पण, आता पाकिस्तानी चाहत्यांनी विराटला डिवचून सापाच्या शेपटीवर पाय ठेवण्यासारखा प्रकार केला आहे. मोहम्मद शमी व भुवनेश्वर कुमार या अनुभवी जोडीकडून आज भरपूर अपेक्षा आहेत.

पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास काय?

ग्रुप २ मध्ये भारत-पाकिस्तानसह दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, झिम्बाब्वे व नेदरलँड्स यांचाही समावेश आहे. ग्रुप २मधील पहिल्याच सामन्यात भारत-पाकिस्तान भिडणार आहेत आणि त्यामुळे आज विजेता संघ गटात टॉपर ठरेल. पण, सामना झालाच नाही तर काय? आयसीसीने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर १२ च्या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवलेला नाही. आयसीसीने उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी व फायनलसाठी राखीव दिवस ठेवला आहे.

सुपर १२मध्ये जिंकणाऱ्या संघाला दोन गुण व पराभूत संघाला शून्य गुण दिला जाणार आहे. पावसामुळे सामना न झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिले जातील. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामना न झाल्यास दोन्ही संघांना १ गुण मिळेल आणि त्यानंतर दोन्ही संघांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्यासाठी उर्वरित ४ सामन्यांत विजय मिळवावा लागेल. त्याचे दडपण दोन्ही संघांवर नक्की दिसेल.

भारत व पाकिस्तान यांच्यासमोर पुढे दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे, बांगलादेश व नेदरलँड्स यांचे आव्हान असणार आहे. चार सामने जिंकल्यास उपांत्य फेरीच स्थान पक्के होईल, परंतु बांगलादेश व आफ्रिका धक्का देऊ शकते. अशात एकजरी सामना हरल्यास ५ मॅचनंतर संघांची गुणसंख्या ही ७ होईल आणि बांगलादेश किंवा आफ्रिका यापैकी ८ गुण कमावणारा संघ पुढे निघून जाईल.