Join us

India Vs South Africa 2018 : टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 21:09 IST

Open in App
1 / 6

टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटीत लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा दुसरा डाव 135 धावांत गुंडाळून, 72 धावांनी दणदणीत विजय साजरा केला.दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव केवळ 130 धावांत गुंडाळण्याची करामत करून दाखविली. परंतू भारतीय फलंदाजांना विजयासाठी 208 धावांचे आव्हानही पेलवले नाही. या विजयाबरोबरच दक्षिण आफ्रिकेने 3 कसोटींच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. जाणून घेऊयात भारतीय संघाच्या पराभवाची पाच कारणे (सर्व फोटो बीसीसीआय)

2 / 6

दक्षिण आफ्रिकेची धारधार गोलंदाजी - प्रमुख गोलंदाज डेल स्टेनच्या अनुपस्थितीत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा केला. सहा बळी टिपणारा व्हेर्नन फिलँडर आणि इतर आफ्रिकन गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली.

3 / 6

अजिंक्य रहाणेला संघाबाहेर बसवणे - पहिला सामना सुरु होण्यापूर्वीच रहाणेला 11 मध्ये संधी देण्यात यावी असे प्रत्येक दिग्गजाचे मत होते. पण सामन्यावेळी संघनिवड करताना विराट कोहली आणि रवी शात्रीने फॉर्ममध्ये असणाऱ्या रोहित शर्माला संधी दिली. रोहित शर्मा दोन्ही डावांमध्ये अपयशी ठरला. त्याला आपल्या दोन्ही डावामध्ये आपली उपयोगिता सिद्ध करता आली नाही. रहाणेची परदेशातील कामगिरी उल्लेखनीय आहे. घरच्या मैदानावर चांगली कामगिरी करु न शकणाऱ्या अजिंक्य रहाणेची आफ्रिकेतली कामगिरी मात्र चांगली आहे.

4 / 6

विराट कोहली बाद झाल्यानंतर फलंदाजी ढेपाळली - पहिल्या आणि दुसऱ्या डावांमध्ये कर्णधार विराट कोहली बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांनी नांग्या टाकल्या. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना येथे भारतीय मारा खेळताना अडचण भासत होती. धवनला दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलियात आखूड टप्प्याचा मारा खेळताना अडचण भासते. त्याची प्रचिती आजही आली. पुजारा अपेक्षेपेक्षा अधिक उसळलेल्या चेंडूवर बाद झाला. उसळी घेणा-या खेळपट्टीवर फलंदाजांनी बॅकफूटचा आणि क्रीझच्या खोलीचा वापर केला नाही तर ते अडचणीत येतात.

5 / 6

सतत पाटा खेळपट्टीवर खेळणं पडलं महागात - गेल्या वर्षभरात भारतीय संघाचे बहुतांश सामने घरच्या मैदानावर झाले. कोलकाता, धरमशाला येथील मैदानावरील सपाट पीचवर भारतीय गोलंदाजी ढेपळली. पण त्यातून बोध न घेता. तोच कित्ता गिरवला गेला. भारताच्या फलंदाजीतील उणिवा चव्हाट्यावर आल्या. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी गमावणे हे पुढील प्रवासात फार महागडे ठरू शकते.

6 / 6

डु प्लेसिससचे नेतृत्व - प्रमुख गोलंदाज डेल स्टेन दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्यामुळं तीन वेगवाग गोलंदाजासह 208 धावां वाचवण्याचे मोठं आव्हान होतं. डु प्लेसिससनं तीन गोलंदाजांचा सुरेख पद्धतीनं वापर केला. छोटा स्पेल करत तिन्ही वेगवान गोलंदाजांचा वापर करत उत्कृष्ट नेतृत्व केलं. फलंदाजी ढेपाळत असताना डिव्हिलर्सला मोठे फटके मारुन धावा वाढवण्याची सुचना केली. अश्विन आणि भुवनेश्वर यांचा चांगला जम बसला होता. एकवेळ ही जोडी सामना जिंकून देईल असे वाटत होते त्याचवेळी फिलँडरचे आक्रमण पुन्हा एकदा लावले. फिलँडरनं कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत ही जोडी फोडली आणि संघाच्या विजयाच्या आशा वाढवल्या.

टॅग्स :भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका २०१८क्रिकेटद. आफ्रिकाविराट कोहलीभारतीय क्रिकेट संघ