IND vs SL 1st T20 Playing XI: रिंकू सिंग की शिवम दुबे? पहिल्या T20 साठी अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग ११

India vs Sri Lanka 1st T20 Playing XI: सूर्यकुमार यादव-गौतम गंभीर जोडीच्या पहिल्या परीक्षेला आजपासून सुरुवात

भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन टी२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. भारतीय वेळेनुसार, संध्याकाळी ७ वाजता हा सामना रंगणार आहे.

या मालिकेच्या माध्यमातून सूर्यकुमार यादव - गौतम गंभीर ही नवी कर्णधार - कोच जोडी आपल्या सर्वोकृष्ट ११ खेळाडूंना मैदानात उतरवेल. ते ११ खेळाडू कोण असतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पहिल्या टी२० मध्ये शुबमन गिल आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी ओपनिंग करेल हे जवळपास निश्चित आहे. तिसऱ्या क्रमांकावर रिषभ पंत आणि चौथ्या क्रमाकांवर कर्णधार सूर्यकुमार यादव खेळेल.

पाचव्या स्थानी अष्टपैलू हार्दिक पांड्या असेल. तर स्पिन गोलंदाजीची जबाबदारी अक्षर पटेल, रवी बिश्नोई सांभाळेल. पल्लेकलचे पिच हे फिरकीसाठी पोषक असल्याने अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरही संघात दिसू शकेल.

फलंदाजीत सहाव्या क्रमांकासाठी रिंकू सिंग आणि शिवम दुबे यांच्यात चुरस आहे. परंतु पिचचा प्रकार आणि संघातील इतर अष्टपैलूंचे कॉम्बिनेशन पाहता, दमदार फिनिशर म्हणून रिंकू सिंगला संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे.

मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग हे दोन वेगवान गोलंदाज संघात खेळतील. पण सराव सत्रात सिराजला दुखापत झाल्याचे वृत्त होते, त्यामुळे तो उपलब्ध नसल्यास खलील अहमदला संधी मिळेल.

शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज / खलील अहमद