भारताचा श्रीलंका दौरा २७ जुलैपासून सुरु होणार आहे. बलाढ्य टीम इंडियाला या मालिकेत यजमानांच्या ५ स्टार खेळाडूंचा सामना करावा लागणार आहे.
पहिले नाव आहे पथुम निसांका. याने लंका प्रीमियर लीगमध्ये आतापर्यंत खेळलेल्या ८ सामन्यांत ३११ धावा केल्या आहेत. १६१ पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने खेळत त्याने एक शतक आणि दोन अर्धशतके ठोकली आहेत.
श्रीलंकेचा फिरकीपटू वानिंदू हसरंगाने कर्णधारपद सोडले असले तरी त्याची कामगिरी दमदार आहे. त्याने लंका प्रीमियर लीगमध्ये ८ सामन्यांत १२ बळी टिपले. ३५ धावांत ४ बळी ही त्याची सर्वोकृष्ट कामगिरी ठरली.
अविष्का फर्नांडो याने लंका प्रिमीयर लीग गाजवले आहे. त्यानेही ८ सामन्यांच्या ८ डावात ३११ धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट १६६ पेक्षा जास्त असून त्याने ४ अर्धशतके झळकावली आहेत.
फलंदाजीतील आणखी एक मोठे नाव म्हणजे कुशल परेरा. त्याने ८ सामन्यांच्या ८ डावात सुमारे १७०च्या स्ट्राइक रेटने २९६ धावा केल्या आहेत. यात एक दमदार शतक आणि २ अर्धशतकांचा समावेश आहे.
मलिंगासारखी अँक्शन असलेला मथिशा पथिराना यानेही लंका प्रीमियर लीगमध्ये चमक दाखवली. त्याने ८ सामन्यांत ८च्या इकॉनॉमीसह १२ विकेट्स घेतल्या. २० धावांत ४ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.