Cricket Buzz»फोटो गॅलरी »भारताचा दणदणीत विजय! Smriti Mandhana ची ऐतिहासिक कामगिरी, नोंदवले ७ विक्रमभारताचा दणदणीत विजय! Smriti Mandhana ची ऐतिहासिक कामगिरी, नोंदवले ७ विक्रम By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2024 8:21 PMOpen in App1 / 7स्मृती मानधनाने या सामन्यात १२७ चेंडूंत १२ चौकार व १ षटकारांसह ११७ धावा केल्या. दीप्ती शर्मा ( ३७ ) व पुजा वस्त्राकर ( ३१) यांनी तिला चांगली साथ दिली. स्मृती मानधनाचे हे घरच्या मैदानावरील पहिले आंतरराष्ट्रीय शतक ठरले. यापूर्वीची तिची सहा शतकं ही भारताबाहेर झाली आहेत.2 / 7स्मृती मानधनाचे हे वन डे क्रिकेटमधील सहावे शतक ठरले आणि भारताकडून सर्वाधिक वन डे शतकं झळकावणाऱ्या भारतीय महिला खेळाडूंमध्ये मिताली राज ( ७) अव्वल स्थानी आहे. स्मृतीने आज कर्णधार हरमनप्रीत कौरला ( ५) मागे टाकले. पूनम राऊतच्या नावावर ३, तर जया शर्मा व थिरुश कामिनी यांच्या नावावर प्रत्येकी दोन शतकं आहेत.3 / 7वन डे क्रिकेटमध्ये भारतीय मैदानांवर सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला खेळाडूंमध्ये स्मृती मानधना ( १२३०) तिसऱ्या क्रमांकावर आली आहे. तिने जया शर्माला ( ११४८) मागे टाकले. मिताली राज ( २८३३) व हरमनप्रीत कौर ( १३१० ) या स्मृतीच्या पुढे आहेत.4 / 7दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रम स्मृती मानधनाच्या नावावर आहे. तिने २०१८ मध्ये किम्बर्ली येथे १३५ धावा केल्या होत्या आणि त्यानंतर तिच्या आजच्या ११७ धावांच्या खेळीचा विक्रम येतो. पुनम राऊतने २०२१ मध्ये लखनौ येथे नाबाद १०४ धावा केल्या होत्या. 5 / 7बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिल्या वहिल्या शतकवीर महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा विक्रम स्मृती मानधनाच्या नावावर नोंदवला गेला आहे. तिने आज आफ्रिकेविरुद्ध ११७ धावा केल्या. यापूर्वी १९९७ मध्ये इंग्लंडची बेलिंडा क्लार्कने वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद ९३ धावा केल्या होत्या. 6 / 7वन डे क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होम आणि अवे अशी दोन शतकं झळकावणारी स्मृती मानधना ही इंग्लंडच्या चार्लोट एडवर्ड्स नंतर दुसरी महिला खेळाडू ठरली. 7 / 7घरच्या मैदानावर भारतीय महिला क्रिकेटपटूने वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रम स्मृतीने नावावर केला. यापूर्वी २०११ मध्ये मिताली राजने वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद १०९ धावा केल्या होत्या. आणखी वाचा Subscribe to Notifications