Deepak Chahar Jaya Marriage: टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू दीपक चहर आणि त्याची प्रेयसी जया भारद्वाज आज (बुधवारी) विवाहबंधनात अडकणार आहेत.
विवाह सोहळ्याआधी मंगळवारी दोन्ही कुटुंबांनी एकत्रितपणे मेहंदी सोहळ्यात सहभाग घेतला.
मेहंदी सोहळ्यात दीपक चहरने पठाणी कुर्ता परिधान केला होता, तर जयाने डिझायनर लेहंगा घातला होता.
लग्नसोहळ्यासाठी जया आपल्या कुटुंबीयांसोबत सोमवारीच ताजनगरी आग्रा येथे पोहोचली होती.
आग्र्याच्या फतेहाबाद मधील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.
विवाहसोहळ्यातील विधींना मंगळवारी संध्याकाळपासूनच सुरू झाली.
मेहंदीच्या कार्यक्रमांनंतर संगीत सोहळ्याचीही धूम पाहायला मिळाली. दीपक आणि जया यांनी या कार्यक्रमात विविध गाण्यांवर डान्स केला.
संगीत सोहळा अविस्मरणीत करण्यासाठी दीपक आणि जयाने आधी संगीत सोहळ्यातील गाण्यांची भरपूर प्रॅक्टीस केली होती.
गेल्या वर्षी IPL सुरू असताना दीपकने जयाला ऑन-कॅमेरा रोमँटिक अंदाजात प्रपोझ केलं होतं. त्यानंतर त्यांनी थाटामाटात साखरपुडाही केला होता. आज हे दोघे लग्नबंधनात बांधले जाणार आहेत. (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)