IND vs AUS : तिसऱ्या 'कसोटी'पूर्वी केएल राहुल पत्नी अथियासोबत 'महाकाल'च्या चरणी नतमस्तक, PHOTOS

KL Rahul Athiya Shetty Worshiped Baba Mahakal: सध्या भारतीय संघ मायदेशात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे.

सध्या भारतीय संघ मायदेशात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पहिले 2 सामने जिंकून यजमान भारतीय संघाने 2-0 अशी आघाडी घेतली आहे.

खरं तर पहिल्या दोन्हीही सामन्यात भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. दोन्हीही सामन्यात फिरकीपटू गोलंदाजांचे वर्चस्व पाहायला मिळाले. मात्र, भारतीय फलंदाजांना साजेशी फलंदाजी करता आली नाही.

सलामीवीर लोकेश राहुलवर खराब फॉर्ममुळे त्याच्यावर टीका होत आहे. भारताचा माजी खेळाडू व्यंकटेश प्रसाद आणि समालोचक आकाश चोप्रा यांच्यात तर राहुलच्या फॉर्मववरून वाद रंगला आहे. त्यामुळे आगामी तिसऱ्या सामन्यात राहुलच्या खेळीकडे विशेष लक्ष असणार आहे.

या तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी लोकेश राहुलने पत्नी अथिया शेट्टीसोबत मध्य प्रदेशातील उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ज्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत.

खरं तर बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर लोकेश राहुल यांनी लग्नानंतर पहिल्यांदाच महाकालेश्वर मंदिराला भेट दिली.

पहाटे 4 वाजता झालेल्या बाबा महाकाल उज्जैनच्या भस्म आरतीमध्ये भारतीय सलामीवीर सामील झाला. यासोबतच या दोघांनी बाबा महाकालची पूजा करून आशिर्वाद घेतले.

या दोन व्हीआयपींशिवाय रविवारी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होती. पहाटे 4 वाजता भस्म आरतीच्या वेळी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले.

लोकेश राहुल सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. त्याच्या शेवटच्या कसोटी शतकानंतर लोकेश राहुलची सरासरी 15.90 आहे, ज्यामुळे संघ व्यवस्थापनासाठी त्याला पाठिंबा देणे आव्हानात्मक झाले आहे. भारतीय संघ 1 मार्चपासून इंदूर येथे तिसरा कसोटी सामना खेळणार आहे.

तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.