भारतीय संघाचा स्टार क्रिकेटर आणि पश्चिम बंगालचा क्रीडा मंत्री मनीष तिवारी याची पत्नी सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींनाही टक्कर देते.
सुस्मिता रॉय असं तिचं नाव असून ती आपले सुंदर आणि ग्लॅमरस फोटो सातत्याने इन्स्टाग्रामवर शेअर करते. ते चाहत्यांना खूप आवडतात.
मनोज तिवारी आणि सुस्मिता रॉय यांची २००७ मध्ये एका कॉमन फ्रेंडद्वारे भेट झाली. मनोज तिवारी पहिल्याच नजरेत प्रेमात पडला.
मैत्रीने सुरुवात अन् नंतर त्याचे प्रेमात रुपांतर... असा मनोज - सुस्मिता जोडीचा अतिशय लोभसवाणा आणि रोमँटिक प्रवास झाला.
जवळपास ७ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर मनोजने २०१३ मध्ये हावडा येथे सुस्मिताशी पारंपरिक बंगाली ब्राह्मण पद्धतीने लग्नगाठ बांधली.
सुस्मिता अनेकदा सोशल मीडियावर रोमँटिक फोटो शेअर करत असते. तसेच ती स्वत:चे सुंदर आणि बोल्ड फोटो शेअर करत असते.
सुस्मिताचे इन्स्टाग्रामवर ४० हजारांहून जास्त फॉलोअर्स आहेत. सुस्मिताच्या ताज्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाइकचा वर्षाव केला आहे.