बाप लेकामध्ये 'दीवार' झालीये आएशा! शिखर धवननं मुलाच्या भेटीसाठी निवडलाय हा मार्ग

शिखर धवनने पुन्हा बोलून दाखवली मनातली गोष्ट

आता शिखर धवनने पुन्हा एकदा मुलावरील आपलं प्रेम आणि त्याच्यासोबत भावनिक नाते यावर भाष्य केले आहे.

क्रिकेटर शिखर धवन याने मुलापासून दूर असल्याचे दु:ख व्यक्त करताना आपल्या मनातील भावना पुन्हा एकदा व्यक्त केल्या आहेत.

बाप लेकाची भेट होऊन वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. माझा नंबर ब्लॉक केला असला तरी मी आजही तीन-चार दिवसांनी एक मेसेज पाठवतो. ते माझं कर्तव्य आहे, असेही धवनने म्हटले आहे.

मुलगा जोरावर याच्यासोबतचे नाते मजबूत ठेवण्यासाठी अध्यात्मिक मार्ग अवलंबतोय, असेही क्रिकेटनं सांगितले आहे.

मुलापासून दूर राहणे खूपच कठीण काळ आहे. प्रत्येक दिवशी त्याची आठवण येते. अध्यात्माच्या आधारे दूर असलेल्या मुलाचा सहवास अनुभवतोय, असे क्रिकेटरनं म्हटलंय.

ध्यान करत असताना मी त्याच्याशी गप्पा मारतो, खेळतो अन् त्याची गळाभेट घेतो, ही मनातील भावनाही धवनने बोलून दाखवलीये.

माझा मुलगा आज ११ वर्षांचा असला तरी मी त्याच्या आयुष्यातील फक्त अडीच वर्षेच पाहिली. तो नेहमी आनंदी राहावा, ही भावना मनात कायम राहील, असे म्हणत धवनने लेकाबद्दलचे प्रेम पुन्हा व्यक्त केले आहे.

धवनपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यावर आएशाने मुलगा जोरावरला आपल्या वडिलांपासून दूर ठेवले आहे.