केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा दिला. १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. सामान्य नागरिकाच्या करमुक्तीसंदर्भातील मुद्दा चर्चेत असताना करोडपती क्रिकेटर किती कर भरतात ही गोष्टीही चर्चेत आलीये. इथं जाणून घेऊयात देशातील स्टार सर्वाधिक कर भरणाऱ्या क्रिकेटर्ससंदर्भातील खास गोष्ट
क्रिकेटमधील बहुमूल्य योगदानाबद्दल बीसीसीआयकडून जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला मास्टर ब्लास्ट सचिन तेंडुलकर हा सर्वाधिक कमाई करणाऱ्या क्रिकेटर्सपैकी एक आहे.
२०२३-२४ या आर्थिक वर्षात मास्टर ब्लास्टर तेंडुलकरनं जवळपास २८ कोटी रुपये इतकी रक्कम कर स्वरुपात भरली आहे.
सर्वाधिक कर भरणाऱ्या क्रिकेटर्सच्या यादीत महेंद्रसिंह धोनीचाही नंबर लागतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीनंतर धोनी वेगवेगळ्या बिझनेसच्या माध्यमातून कमाई करतो. याशिवाय तो आयपीएलमध्येही सक्रिय आहे.
महेंद्रसिंह धोनीनं २०२३-२४ या वर्षात आपल्या कमाईतील मोठा हिस्सा कर स्वरुपात भरला आहे. सचिन तेंडुकरच्या तुलनेत त्याने कर स्वरुपात भरलेली रक्कम १० कोटींपेक्षा अधिक आहे. धोनीनं तब्बल ३८ कोटी कर भरला आहे.
विराट कोहली हा सध्याच्या घडीला क्रिकेट जगतातील किंग आहे. एवढेच नाही तर तो सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे.
भारतीय संघाचा स्टार बॅटर बीसीसीआय करार, आयपीएलमधील RCB संघाकडून मिळणारे तगड्या पॅकेजसह इन्टाग्रामच्या पोस्टच्या माध्यमातून तगडी कमाई करतो
२०२३-२४ या आर्थिक वर्षात विराट कोहलीनं ६६ कोटी रुपये कर भरला आहे. तो सर्वाधिक कर भरणाऱ्या क्रिकेटर्सच्या यादीत सर्वात टॉपला आहे.