2. कॅमेरून ग्रीन-
सॅम कुरनसाठीचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर मुंबई इंडियन्सने मोर्चा ऑस्ट्रेलियन खेळाडूकडे वळवला अन् आयपीएल इतिहासातील तो दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरेपर्यंत त्याच्यावर बोली लावली. पण, हे करत असताना MI ने बटव्यातील २०.५५ कोटींमधील १७.५० कोटी त्या एकाच खेळाडूसाठी उडवले. ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीनची मुळ किंमत २ कोटी होती आणि मुंबई इंडियन्सने सुरूवातीपासूनच त्यांच्यावर बोली लावली. ७ कोटींपर्यंत ग्रीनची बोली गेली आणि त्याला दिल्ली कॅपिटल्स जबाबदार ठरले. MI vs DC यांच्यात चांगलाच संघर्ष पाहायला मिळाला. १६.५० कोटीं पर्यंत दिल्ली शर्यतीत होती, परंतु मुंबईने बोली १७ कोटींच्या वर नेली अन् त्यांना माघार घ्यावी लागली.