जैस्वालचे वडील भूपेंद्र यांनी 'हिंदुस्तान टाइम्स'शी संवाद साधताना खुलासा करताना म्हटले, "पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी शतक झळकावल्यानंतर यशस्वीने पहाटे साडेचार वाजता व्हिडीओ कॉल केला. तेव्हा तो रडत होता. मला देखील अश्रू अनावर झाले. तो खूप भावनिक क्षण होता. तो माझ्याशी जास्त वेळ बोलू शकला नाही कारण तो खूप थकला होता. त्याने मला एवढेच विचारले की, बाबा तुम्हाला आनंद झाला ना?."