शिवम मावीची लक्झरी लाइफ! विराट-रोहितप्रमाणे साज; पाहा ऑडी A5 ते BMW चा ताफा

shivam mavi ipl: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शिवम मावीने श्रीलंकेविरूद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय संघात पदार्पण केले.

शिवम मावीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नुकतीच पावले टाकली आहेत. मात्र, तो बऱ्याच काळापासून आयपीएलमध्ये योगदान देत आहे. शिवम मावी आयपीएलच्या कमाईच्या जोरावर आलिशान लाइफ जगत आहे.

या वेगवान गोलंदाजाने 2018 मध्ये त्याच्या आयपीएल कारकिर्दीला सुरुवात केली. त्यादरम्यान कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने मावीवर बोली लावली आणि त्याला करोडपती बनवले. मावीला केकेआरने तीन कोटी रुपयांच्या मोबदल्यात आपल्या संघात समावेश केला.

केकेआरच्या फ्रँचायझीने 2022 च्या मेगा लिलावात 7.25 कोटी रूपये खर्च केले होते. तर आगामी हंगामात मावी गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसणार आहे. ज्यासाठी फ्रँचायझीने वेगवान गोलंदाजावर 6 कोटी रुपये खर्च केले आहेत.

भारत अ संघाकडून खेळतानाही खेळाडूंना मानधन दिले जाते. या खेळाडूच्या कमाईची नेमकी आकडेवारी उपलब्ध नाही. पण माहितीनुसार, त्याची एकूण संपत्ती 40 कोटींच्या आसपास आहे.

शिवम मावीलाही गाड्यांचा शौक आहे. तो कोट्यवधी रुपयांच्या गाड्यांचा मालक आहे. वेगवान गोलंदाजाकडे ऑडी A5 आणि BMW सुद्धा आहे. Audi A5 ची सुरुवातीची किंमत 55 लाख रुपये होती.

श्रीलंकेविरुद्ध पदार्पणातच युवा गोलंदाजाने 22 धावा देत 4 फलंदाजांना बाद केले. खरं तर पदार्पणाच्या सामन्यातच 4 बळी घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. एवढेच नाही तर दुसऱ्या सामन्यातही त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीचे श्रीलंकन गोलंदाजांना घाम फोडला.

मावीने फुलचंद राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गोलंदाजीकडे वळण्याचा निर्णय घेतला होता. विशेष म्हणजे या खेळाडूने क्रिकेटला सुरुवात केली ती फलंदाजीच्या उद्देशाने. पण, फूलचंद राजपूत यांनी त्याला गोलंदाज बनवण्याचा निर्णय घेतला होता.

श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेत भारतीय संघाने पाहुण्या श्रीलंकेला पराभवाची धूळ चारली. हार्दिक सेनेने 2-1 ने विजय मिळवून परंपरा कायम राखली.