Just Another Excuse To Celebrate YOU! पत्नीच्या वाढदिवशी 'हिटमॅन'चा रोमँटिक अंदाज

ritika sajdeh birthday : आज रोहित शर्माची पत्नी रितीका सजदेह हिचा वाढदिवस आहे.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या क्रिकेटपासून दूर असला तरी तो आगामी काळात दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेत दिसणार आहे. वन डे विश्वचषकानंतर रोहितने अद्याप एकही सामना खेळला नाही.

मैदानाबाहेर असलेला रोहित अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून पायउतार झाल्यानंतर रोहित प्रसिद्धीच्या झोतात आहे. आता हिटमॅनने पत्नी रितीका सजदेहच्या वाढदिवशी काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

तसेच रोहितने रोमँटिक अंदाजात रितीकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. "तुला साजरे करण्याचे आणखी एक निमित्त... वाढदिवसाच्या शुभेच्छा RITS", अशा आशयाचे कॅप्शन त्याने दिले.

रोहितने एकूण सात फोटो शेअर केले आहेत. रितीका आज तिचा ३६वा वाढदिवस साजरा करत आहे.

भारतीय संघातील अनेक शिलेदारांनी रितीकाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने देखील यानिमित्ताने रितीका आणि रोहितचा फोटो पोस्ट केला आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी झाल्यानंतर हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. तर, रोहित पहिल्यांदाच हार्दिकच्या नेतृत्वात खेळताना दिसेल.