Join us  

१२ महिला क्रिकेटपटू ज्यांनी मुलींनाच बनवलं 'जीवनसाथी', जाणून घ्या त्यांची कहाणी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 7:04 PM

Open in App
1 / 8

द्युती चंदने आपल्या महिला मैत्रीणीसोबत लग्न केल्याने ती चांगलीच चर्चेत आहे. भारतात अशी प्रकरणे फार कमी पाहायला मिळतात. याबाबत तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली. या धावपटूने आशियाई क्रीडा स्पर्धेपासून दक्षिण आशियाई खेळापर्यंत पदकेही जिंकली आहेत. द्युतीशिवाय आणखी १२ महिला क्रिकेटपटूंनी देखील महिला सहकाऱ्यांशी संसार थाटला आहे.

2 / 8

ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज मेगन शुटने दीर्घकाळ मैत्री केल्यानंतर जेस हॉलिओक्सशी लग्न केले. तिने विश्वचषकाचे विजेतेपदही पटकावले आहे. शटने ७७ वनडे सामन्यांमध्ये ११२ बळी घेतले आहेत. तर ८४ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १०८ बळी घेतले आहेत. तिने ४ कसोटी सामने देखील खेळले आहेत.

3 / 8

ऑस्ट्रेलियाची फिरकीपटू आणि अष्टपैलू जिस जोनासेननेही विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये कांगारू संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. खरं तर तिने तिची सहकारी सारा व्हिएर्नशी लग्न केले आहे. जोनासेनने ४ कसोटीत ६ बळी, ८५ वनडे सामन्यांमध्ये १३१ बळी आणि ९४ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८७ बळी घेतले आहेत.

4 / 8

इंग्लंडची वेगवान गोलंदाज नतालिया सीव्हरने सहकारी खेळाडू कॅथरीन ब्रंटशी २०२२ मध्येच लग्न केले. सीव्हरने ८ कसोटीत १० बळी घेण्यासोबतच एक शतक आणि २ अर्धशतके देखील झळकावली आहेत. तर ९१ वनडे सामन्यांमध्ये ५ शतके आणि १८ अर्धशतकाच्या मदतीने २,८२९ धावा केल्या आहेत. तसेच ६३ बळी घेतले आहेत.

5 / 8

दक्षिण आफ्रिकेची आक्रमक महिला क्रिकेटर लीझेल लीने २०२० मध्ये तंजा क्रोनिएशी लग्न केले. क्रोनिए ही देखील एक महिला क्रिकेटपटू आहे. लीझेलने १०० वनडे सामन्यांमध्ये ३ शतके आणि २३ अर्धशतकांच्या जोरावर ३,३१५ धावा केल्या आहेत.

6 / 8

ऑस्ट्रेलियाची आणखी एक दिग्गज महिला क्रिकेटर रॅचेल हेन्स ही मोठ्या कालावधीपासून लीग पॉल्टनसोबत आहे. २०२१ मध्ये त्यांनी एका मुलाचे पालकत्व देखील स्वीकारले आहे. पॉल्टन ही महिला क्रिकेटपटूही आहे. हेन्सने ७७ वनडे सामन्यांमध्ये २ शतके आणि १९ अर्धशतकांच्या मदतीने २.५८५ धावा केल्या आहेत.

7 / 8

याशिवाय ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटर ॲलेक्स ब्लॅकवेलने लिन्से एक्यूशी, न्यूझीलंडची एमी सुथरवेटने महिला क्रिकेटपटू ली ताहुहूशी, दक्षिण आफ्रिकेची कर्णधार डेन निकर्कने सहकारी खेळाडू मारिजाना कॅपशी आणि इंग्लंडची आंतरराष्ट्रीय क्रिकेटर लॉरेन विनफिल्डने कोर्टनी हिलशी लग्न केले आहे.

8 / 8

दुसरीकडे, न्यूझीलंडच्या हेली जेन्सन आणि ऑस्ट्रेलियाच्या निकोला हॅनकॉक यांनी देखील विवाह केला आहे. याशिवाय न्यूझीलंडची क्रिकेटपटू मॅडी ग्रीन आणि लिझ पेरी आणि ऑस्ट्रेलियाच्या ॲलिसा विलानी आणि निकोला बोल्टन यांनी देखील महिला सहकाऱ्याशीच लग्न केले आहे.

टॅग्स :आंतरराष्ट्रीय क्रिकेटमहिलालग्न
Open in App