Join us  

हरमनवर बंदी पण 'विदेशात' खेळणार; भारतीय महिला सज्ज, 'लेडी' सेहवागचं पदार्पण!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2023 8:44 PM

Open in App
1 / 10

१ ऑगस्टपासून द हंड्रेड लीगच्या तिसऱ्या हंगामाला सुरूवात होत आहे. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार असून सात वेगवेगळ्या ठिकाणी ३४ सामने खेळवले जाणार आहेत. भारतीय महिला संघातील काही खेळाडू देखील या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

2 / 10

मंगळवारपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेचा अंतिम सामना २७ ऑगस्ट रोजी लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाईल.

3 / 10

या स्पर्धेत भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर, उप कर्णधार स्मृती मानधना, अष्टपैलू जेमिमा रॉड्रिग्ज आणि यष्टिरक्षक फलंदाज रिचा घोष या चार भारतीय महिला क्रिकेटपटू सहभागी झाल्या आहेत.

4 / 10

२०२२ मधील हंगामाला मुकलेली हरमनप्रीत कौर दुसऱ्यांदा या स्पर्धेत खेळत आहे. २०२१ मध्ये तिने पदार्पणाच्या हंगामात सहभाग नोंदवला होता. पहिल्या हंगामात भारतीय कर्णधाराला तीन सामन्यांमध्ये १०९ धावा करण्यात यश आले.

5 / 10

खरं तर दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर होण्यापूर्वी हरमनची सरासरी ५२ एवढी होती. यंदा ती नेट सीव्हर-ब्रंटच्या नेतृत्वाखाली ट्रेंट रॉकेट्सकडून खेळणार आहे. खरं तर बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात गैरवर्तन केल्यामुळे हरमनप्रीतवर आयसीसीने दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांची बंदी घातली आहे.

6 / 10

लक्षणीय बाब म्हणजे हरमन आणि ब्रंट या दोघीही या वर्षाच्या सुरुवातीला महिला प्रीमिअर लीगमध्ये मुंबई इंडियन्सकडून एकत्र खेळल्या आहेत. चॅम्पियन संघाच्या शिलेदार आगामी काळात कशी कामगिरी करतात हे पाहण्याजोगे असेल.

7 / 10

भारतीय संघाची उप कर्णधार स्मृती मानधना द हंड्रेडच्या सलग तिसऱ्या हंगामात खेळत आहेत. ती Southern Braveच्या संघाचा भाग आहे.

8 / 10

स्मृती मानधनाच्या संघाने २०२१ आणि २०२२ मध्ये अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. पण, दोन्हीही वेळा Southern Braveच्या संघाला Oval Invinciblesकडून पराभवाचा सामना करावा लागला.

9 / 10

भारतीय संघाची अष्टपैलू खेळाडू जेमिमा रॉड्रिग्स नॉर्दर्न सुपरचार्जर्सकडून सलग तिसरा हंगाम खेळत आहे.

10 / 10

भारताची लेडी सेहवाग रिचा घोष देखील द हंड्रेडसाठी सज्ज झाली आहे. ती यंदा आपल्या पदार्पणाचा हंगाम खेळत असून हीदर नाइटच्या नेतृत्वाखालील लंडन स्पिरिटच्या संघाचा ती भाग आहे.

टॅग्स :स्मृती मानधनाहरनमप्रीत कौरभारतीय क्रिकेट संघटी-20 क्रिकेटइंग्लंड
Open in App