Cricket Buzz»फोटो गॅलरी »भारताचे युवा खेळाडू स्वत:ला सिद्ध करण्यास सज्जभारताचे युवा खेळाडू स्वत:ला सिद्ध करण्यास सज्ज By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2018 11:04 PMOpen in App1 / 5कोलंबो : रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताचा युवा संघ मंगळवारी तिरंगी निधास टी-२० कप स्पर्धेच्या सलामी लढतीत श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जाणार आहे. 2 / 5पुढील वर्षी होणा-या विश्वकप स्पर्धेत निवड समितीचे लक्ष वेधण्याची युवा खेळाडूंना संधी आहे. यंदाच्या मोसमात भारताने श्रीलंकेविरुद्ध मायदेशात व श्रीलंकेत १८ आंतरराष्ट्रीय (६ कसोटी, ८ वन-डे आणि ४ टी-२०) सामने खेळले आहेत.3 / 5बांगलादेश या मालिकेत सहभागी झालेला तिसरा संघ आहे. भारताने या मालिकेसाठी आघाडीच्या सहा खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे. 4 / 5रिषभ पंत, दीपक हुड्डा व मोहम्मद सिराज यांचा संघात समावेश आहे. आयसीसी विश्वकप स्पर्धेला केवळ १६ महिन्यांचा कालावधी शिल्लक असून प्रत्येक खेळाडू निवड समितीचे लक्ष वेधण्यास प्रयत्नशील आहे.5 / 5भारतीय संघाने जास्तीतजास्त वेळा श्रीलंका संघाला पराभूत केले आहे. कार्यवाहक कर्णधार रोहित शर्माकडे जेतेपद पटकावण्याची चांगली संधी आहे. दक्षिण आफ्रिका दौ-यात निराशाजनक कामगिरीनंतर रोहित शर्माला सूर गवसण्याची आशा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications