ICC Women’s T20 World Cup : 'ओन्ली लेडीज' थीम; यातील २ भारतीय चेहरेही लक्षवेधी

मॅच अंपायर्स आणि रेफ्रींच्या यादीत दोन भारतीय चेहऱ्यांचा समावेश

ICC महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच पंच आणि रेफ्रीची जबाबदारी फक्त महिलांकडे सोपवली आहे. इथं एक नजर टाकुयात ओन्ली लेडीज थीममधील चेहऱ्यांवर

लॉरेन अगेनबॅग या दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधीत्व करतात. २०१९ मध्ये त्यांनी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचगिरी केली होती.

न्यूझीलंडच्या किम कॉटन यांनी श्रीलंका आणि न्यूझीलंड पुरुष संघातील टी -२० लढतीत इतिहास रचला होता. त्या पुरुष गटातील क्रिकेटमधील आंतरारष्ट्रीय सामन्यात पंचगिरी करणाऱ्या पहिल्या पहिला पंच आहेत.

महिला टी-२० वर्ल्ड कप २०२४ च्या हंगामासाठी अंपायर्स पॅनलमध्ये झिम्बाब्वेच्या सारा डंबनेवना यांचाही समावेश आहे. ती झिम्बाब्वे महिला संघातील एक माजी गोलंदाज आहे.

ॲना हॅरिस या इंग्लंडच्या क्रिकेट पंच आहेत. या चेहऱ्याचाही यंदाच्या महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पंचांच्या यादीत समावेश आहे.

निमाली परेरा ही श्रीलंकन अंपायरही महिला टी-२० वर्ल्ड कपमध्ये पंचगिरी करताना दिसणार आहे. याधीच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये हा चेहरा दिसला होता. सध्या अंपायरच्या रुपात सक्रीय असणारा ही महिला श्रीलंका आर्मी स्पोर्ट्स क्लबकडून क्रिकेट खेळली आहे.

क्लेर पोलोसॅक या ऑस्ट्रेलियन क्रिकेट पंचही टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अंपायर्स पॅनलचा भाग आहेत. ३६ वर्षीय महिला क्रिकेट पंच पेशाने स्कूल टीचर आहेत.

३५ वर्षीय वृंदा राठी हा महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या महिला अंपायर्सच्या यादीतील भारतीय चेहरा आहे. कसोटीत पंच म्हणून भूमिका बजावणाऱ्या त्या भारताच्या पहिल्या महिला पंच आहेत.

सुझॅन रेडफर्न या महिला पंचाच्या रुपात दिसणाऱ्या चेहऱ्यानं इंग्लंड महिला क्रिकेट संघाकडून ६ कसोटी सामन्यांसह १५ वनडे सामने खेळले आहेत.

एलोइस शेरिडान या ऑस्ट्रेलियन पंच आहेत. ऑस्ट्रेलियातील प्रथम श्रेणी क्रिकेटमधील शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत पंच म्हणून काम पाहणारी पहिला पंच असा खास रेकॉर्ड या चेहऱ्याच्या नावे नोंदवला गेला आहे.

जॅकलिन विल्यम्स या पुरुष टी-२० सामन्यात पंच म्हणून काम पाहणाऱ्या पहिल्या कॅरेबियन महिला पंच म्हणून ओळखल्या जातात.

महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धीतील ३ रेफ्रींच्या यादीत दक्षिण आफ्रिकेच्या शांड्रे अलविदा फ्रित्झ आणि श्रीलंकन मिशेल परेरा याशिवाय भारतीय चेहराही आहे. भारताच्या जीएस लक्ष्मी हे ते नाव. ज्या टी-२० क्रिकेटमधील पहिल्या महिला रेफ्रीही आहेत.