Join us  

भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू! २० हजार कोटींची मालमत्ता असलेल्या खेळाडूची इंटरेस्टींग स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 12:17 PM

Open in App
1 / 7

क्रिकेट हा भारतात सर्वात जास्त फॉलो केला जाणारा आणि पैशाचा पाऊस पाडणारा खेळ आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) फक्त इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेचे मीडिया हक्क विकून ४३ हजार कोटी रुपयांहून अधिक कमावले. विराट कोहली, भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि भारताचा दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर या सर्वांची संपत्ती १ हजार कोटींहून अधिक आहे हे उघड गुपित आहे.

2 / 7

कोहली, धोनी आणि तेंडुलकर यांची एकूण संपत्ती ही बडोदा राज्यातील अज्ञात प्रथम श्रेणी क्रिकेटपटूच्या तुलनेत फारच कमी आहे. इरफान पठाण आणि युसूफ पठाण सारख्या माजी भारतीय क्रिकेटपटू घडवणारे हे राज्य. येथेच भारतातील सर्वात श्रीमंत भारतीय क्रिकेटपटू, समरजितसिंग रणजितसिंह गायकवाड यांचे घर आहे, ज्यांची एकूण संपत्ती २० हजार कोटींहून अधिक आहे.

3 / 7

रणजितसिंह प्रतापसिंह गायकवाड आणि शुभांगिनी राजे यांचे ते एकुलते एक पुत्र आहेत. १९८७-८८ आणि १९८८-८९ हंगामात समरजितसिंह बडोद्यासाठी सहा प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले. निवृत्तीनंतर ते क्रिकेट प्रशासक बनले आणि बडोदा क्रिकेट असोसिएशन (BCA) चे अध्यक्ष म्हणून काम केले.

4 / 7

बडोद्याच्या गायकवाडांनी २०१३ मध्ये ३ अब्ज पौंड किंवा सुमारे २० हजार कोटी रुपयांचा २३ वर्षांचा वारसा वाद मिटवला तेव्हा समरजितसिंग गायकवाड एका रात्रीत जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक बनले. बडोद्याचे महाराज एकेकाळी भारतातील सर्वात शक्तिशाली संस्थानांपैकी एकाचे राज्यकर्ते होते, त्यांच्या स्वत:च्या सैन्य आणि नौदलासह त्यांनी लक्ष्मी विलास पॅलेसचे नियंत्रण केले होते, ही भव्य मालमत्ता बकिंगहॅम पॅलेसच्या चौपट आहे.

5 / 7

समरजितसिंह हे निपुण गोल्फपटूही आहेत. १९८८ मध्ये महाराजा फेतेसिंगराव गायकवाड यांच्या निधनानंतर ३ अब्ज पौंडची अंदाजे इस्टेट वादात सापडली होती. त्यांचा धाकटा भाऊ रणजितसिंह त्यांच्या गादीवर आला, पण दुसरा भाऊ संग्रामसिंह म्हणाले की कौटुंबिक परंपरेनुसार त्यांना इस्टेटमध्ये अर्धा वाटा मिळायला हवा.

6 / 7

“त्यांच्या आईने त्यांना नाकारल्यानंतर त्याने कायदेशीर कारवाई सुरू केली, परंतु २३ वर्षांच्या वादावर तोडगा काढण्यासाठी रंजतसिंह यांचे वारस, महाराजा समरजितसिंह गायकवाड यांनी गेल्या वर्षी त्यांच्या राज्याभिषेकानंतर लगेचच वाटाघाटी सुरू केल्या,” असे वृत्त यूकेच्या द टेलिग्राफ वृत्तपत्राने दिले.

7 / 7

करारानुसार महाराजा समरजितसिंह गायकवाड यांनी लक्ष्मी विलास पॅलेस आणि इस्टेटचा सिंहाचा वाटा, त्यातील बहुतांश दागिने आणि १९व्या शतकातील भारतीय चित्रकार राजा रवि वर्मा यांच्या मौल्यवान चित्रांचा संग्रह राखून ठेवला.

टॅग्स :लाइफस्टाइलऑफ द फिल्ड
Open in App