India's scenario for WTC Final: कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळायची की नाही, हे भारताच्याच हाती; समोर आले महत्त्वाचे अपडेट्स

India's scenario for World Test Championship Final: ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर तिसऱ्या कसोटीत पावसामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागले. अन् सर्व गणित पुन्हा बिघडले.

India's scenario for World Test Championship Final: ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर तिसऱ्या कसोटीत पावसामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अनिर्णित निकालावर समाधान मानावे लागले. सिडनी कसोटी पावसामुळे रद्द करावी लागली आणि ऑस्ट्रेलियाला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतील स्थानावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. २०१२१-२३च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या तीन मालिका शिल्लक आहेत आणि आता वर्ल्ड कप फायनल खेळायची की नाही हे आता सर्वस्वी भारतीय संघाच्या हाती आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात २-० ने मालिका जिंकल्यानंतर, ऑस्ट्रेलियाची जय-पराजयाची टक्केवारी ही ७५.५६ इतकी झाली आहे आणि त्यांनी जवळपास अंतिम फेरीत जागा निश्चित केली आहे. भारताकडून चारही कसोटी गमावल्यास आणि श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही कसोटी जिंकल्या तरच ऑस्ट्रेलियाला अंतिम फेरीला मुकावे लागेल. भारताकडून ०-४ ने हरल्यास ऑस्ट्रेलियाची टक्केवारी ५९.६५ वर जाईल.

न्यूझीलंडमध्ये निर्विवाद वर्चस्व राखल्यास श्रीलंकेची टक्केवारी ६१.११ वर जाईल, जरी श्रीलंकेने न्यूझीलंडमध्ये १-० असा विजय मिळवला तरीही भारताविरुद्ध सर्व कसोटी गमावल्यानंतरही ऑस्ट्रेलियाची टक्केवारी जास्त असेल. ऑस्ट्रेलियाला इतर संघांवर अवलंबून राहायचे नसेल तर त्यांना कोणतेही पेनल्टी गुण न देता केवळ एक सामना ड्रॉ राखायचा आहे. एक ड्रॉ आणि ०-३ असा निकाल लागल्यानंतरही ऑस्ट्रेलियाची टक्केवारी ही श्रीलंकेपेक्षा किंचित पुढे राहिल. पण, एक पेनल्टी पॉइंट मिळाल्यास त्यांचे गुण ६०.९६% पर्यंत कमी होतील.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ०-२ पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचे नुकसान झाले, परंतु सिडनीमध्ये पावसाच्या कृपेने आफ्रिकेला संधी दिली आहे. आफ्रिकेचा संघ सध्या ४८.७२% सह चौथ्या क्रमांकावर आहे आणि जर त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या पुढील दोन कसोटी जिंकल्या तर त्यांची टक्केवारी ५५.५६ अशी होईल. अंतिम फेरीसाठी पात्र होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला दोन्ही सामने जिंकणे आवश्यक आहे. शिवाय, श्रीलंकेला फक्त एक विजय किंवा एकही विजय मिळाला नाही आणि भारताला २१ पेक्षा कमी गुण मिळाले तर त्यांची फायनल नक्की होईल.

तिसऱ्या स्थानावर असलेल्या श्रीलंकेलाही संधी आहे. जर त्यांनी न्यूझीलंड दौऱ्यावरील दोन्ही कसोटींमध्ये विजय मिलवल्यास त्यांची टक्केवारी ६१.११ अशी होईल. त्यानंतर त्यांना एकतर भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-० असा विजय किंवा अनिर्णित मालिका किंवा ऑस्ट्रेलियाचा मालिकेत विजय अशा निकालाची वाट पाहावी लागेल.

श्रीलंकेने मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवल्यास त्यांची टक्केवारी ५२.७८ इतकी राहिल. या टक्केवारीसह पात्र होण्यासाठी, त्यांना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारताने १२ पेक्षा जास्त गुण मिळवू नयेत अशी प्रार्थना करावी लागेल. (भारताने मालिका 3-1 किंवा 1-0 ने गमावली) आणि दक्षिण आफ्रिकेने १६ पेक्षा जास्त गुण मिळवले नाहीत (मालिका 1-0 जिंकली),तर श्रीलंकेचा मार्ग सुकर होईल.

भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३-१ किंवा त्याहून अधिक विजय मिळवला तर अन्य मालिकांचा निकाल काहीही लागला तरी टीम इंडिया फायनलसाठी पात्र ठरेल. बांगलादेशविरुद्ध २-० अशी मालिका जिंकल्यानंतर भारतीय संघ सध्या ५८.९३ % सह दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४-० असे जिंकल्यास ६८.०६%, ३-१ असे जिंकल्यास ६२.५% आणि २-२ अशी बरोबरी राहिल्यास ५६.९४% होतील.

मालिका २-२ अशी बरोबरीत राहिल्यास आणि श्रीलंकेने न्यूझीलंडमध्ये २-० ने विजय मिळवला तर भारत पहिल्या दोनमधून बाहेर पडेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ पेक्षा कमी गुण मिळवल्यास आणि दक्षिण आफ्रिकेने घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध २-० असा विजय मिळवल्यास भारतीय संघ आफ्रिकेच्या मागेही घसरू शकतो. भारतीय संघाने २१ गुण कमावण्यात यश मिळवले, तर दक्षिण आफ्रिकेने मालिका १-० ने जिंकली किंवा २-२ (२४ गुण) बरोबरी केली तरते पुढे राहितली, परंतु १-१ बरोबरी (२० गुण) मिळवली तरीही ते पुढे नसतील.

इंग्लंड, वेस्ट इंडिज, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि बांगलादेश हे बाकीचे संघ आहेत आणि सगळे खूप मागे आहेत. न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज हे दोनच संघ अनेक मालिका शिल्लक आहेत, पण त्यांना जास्तीत जास्त गुण मिळाले तरी तेही कमी पडतील.