Join us  

India's T20 World Cup squads : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१मधील सहा खेळाडूंना यंदा मिळाला डच्चू; मराठमोळ्या खेळाडूला डावलले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 11:04 AM

Open in App
1 / 9

भारतीय चाहते ज्याची प्रतीक्षा पाहत होते, तो ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीचा संघ अखेर जाहीर झाला. BCCI ने सोमवारी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आणि चार राखीव खेळाडूंची निवड केली. मागील वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरी पाहून यंदा भारतीय संघात बरेच बदल पाहायला मिळाले. मागच्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघातील ६ खेळाडू यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये खेळणार नाहीत....

2 / 9

आशिया चषक २०२२ स्पर्धेतील कामगिरीनंतर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या भारतीय संघात बदल पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्याने तो वर्ल्ड कप खेळू शकणार नाही, हे जवळपास निश्चित होते. त्याच्या जागी कोणाला संधी मिळेल याची उत्सुकता होती. जडेजाला रिप्लेसमेंट म्हणून दीपक हुडा व अक्षर पटेल यांची संघात निवड केली गेली आहे.

3 / 9

रवींद्र जडेजा व आवेश खान ही दोन नावं वगळल्यास आशिया चषक २०२२ मध्ये खेळणाराच संघ कायम आहे. जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल हे दुखापतीतून सावरून संघात परतले आहेत. या दोघांच्या अनुपस्थितीत भारताच्या गोलंदाजीतील उणीवा प्रकर्षाने जाणवल्या, परंतु आता संघ मजबूत वाटतोय.

4 / 9

भारताच्या वर्ल्ड कप संघात जसप्रीत, हर्षल, भुवनेश्वर कुमार व अर्शदीप सिंग हे चार जलदगती गोलंदाज आहेत. भुवीचे संघात असणे अपेक्षित होतेच, अर्शदीपने कामगिरीच्या जोरावर वर्ल्ड कप संघात स्थान पटकावले. हार्दिक पांड्या हा पाचव्या जलदगती गोंदाजाची उणीव भरून काढण्यासाठी सज्ज आहेच.

5 / 9

मोहम्मद शमी संघात परतला आहे, परंतु त्याची राखीव खेळाडूंमध्ये निवड केली गेली आहे. 15 सदस्यीय संघात जसप्रीत बुमराह व हर्षल पटेल यांचे पुनरागमन वगळल्यास फार बदल झालेला नाही. आशिया चषकात अपयशी ठरलेल्या आवेश खानला विश्रांती दिली गेली आहे. पण, मागच्या वर्ल्ड कप स्पर्धेत आलेल्या अनुभवातून धडा घेत भारताने यंदाच्या संघात ६ बदल केले आहेत.

6 / 9

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२चा भारतीय संघ- रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अक्षर पटेल,अर्शदीप सिंग; राखीव खेळाडू - मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चहर

7 / 9

8 / 9

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१चा भारतीय संघ- रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली ( कर्णधार), सूर्यकुमार यादव, इशान किशन, रिषभ पंत, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, राहुल चहर, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, मोहम्मद शमी

9 / 9

मागच्या वर्ल्ड कपमध्ये खेळलेल्या इशान किशन ( खराब फॉर्म), रवींद्र जडेजा ( दुखापत), राहुल चहर, वरुण चक्रवर्थी व शार्दूल ठाकूर ( खराब फॉर्म) आणि मोहम्मद शमी यांना यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या मुख्य संघातून वगळले गेले आहे. शमीचा राखीव खेळाडू म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. दीपक हुडा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल व अर्शदीप हे यंदाच्या संघातील सहा बदल आहेत.

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारतीय क्रिकेट संघआर अश्विनमोहम्मद शामीयुजवेंद्र चहल
Open in App