Join us  

भारताचा अव्वल गोलंदाज बुमराचे होते वाईट दिवस, होते फक्त एकच टी-शर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 7:56 PM

Open in App
1 / 7

बुमराची आई दलजित, ही शाळेमध्ये शिक्षिका होती. बुमराचे बाबा तो लहान असतानाच वारले. त्यानंतर त्यांच्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला.

2 / 7

आईकडून सर्वच लाड आता पूर्ण होत नव्हते. परिस्थिती बेताचीच होती. घर चालवायचं की जसप्रीतच्या क्रिकेटच्या वेडासाठी नवीन वस्तू घ्यायच्या, हा प्रश्न दलजित यांच्यापुढे होता. नक्कीच, त्यांनी घर चालवायला प्रधान्य दिलं.

3 / 7

जसप्रीतकडे त्यावेळी फक्त एक जोडी शूज होते, एक टी-शर्ट होतं. त्यावेळी तो मला शूज हवेत, म्हणून आईच्या मागे लागला होता.

4 / 7

ते दोघे एका शूजच्या दुकानात गेलेही, पण तिथे शूजची किंमत बघून ते परतले. तेव्हा सर्वात जास्त दु:ख जसप्रीतपेक्षा त्याच्या आईला झाले होते.

5 / 7

एका व्हिडीओमध्ये तिने या साऱ्या गोष्टी सांगितल्या, त्यावेळी दलजित यांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

6 / 7

आयपीएलमधील मुंबई इंडियन्स संघाच्या मालकिण नीता अंबानी या लंडनमध्ये एका कार्यक्रमात बोलत होता. त्यावेळी त्यांनी ही आठवण सांगितली.

7 / 7

सध्याच्या घडीला बुमरा क्रिकेट विश्वातील अव्वल गोलंदाज आहे.

टॅग्स :जसप्रित बुमराह