युवा विश्वचषकात देशाचे नेतृत्व करणारे 'हे' कर्णधार भारताकडून खेळू शकले नाहीत

इशान किशन : महेंद्रसिंग धोनीच्या झारखंडमधून खेळणाऱ्या इशान किशनने २०१६ साली भारतीय संघाची कमान सांभाळली होती. पण अजूनही इशानला भारतीय संघात प्रवेश करता आलेला नाही.

उन्मुक्त चंद : युवा विश्वचषकात २०१२ साली उन्मुक्त चंदने देशाचे नेतृत्व केले होते. पण अजूनपर्यंत तरी चंदला भारतीय संघात स्थान कमावता आलेले नाही.

विजय झोल : महाराष्ट्राच्या विजय झोलच्या नेतृत्वाखाली देशाचा युवा संघ विश्वचषकात खेळला होता. पण विजयला मात्र भारतीय संघातून खेळण्याचे स्वप्न पूर्ण करता आले नाही.

अशोक मनेरिया : राजस्थानच्या अशोक मनेरियाच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २०१० साली युवा विश्वचषक खेळला होता. पण भारतीय संघाने मात्र त्याला खेळण्याची संधी दिली नाही.

रविकांत शुक्ला : रविकांतच्या नेतृत्वाखाली २००६ साली भारतीय संघ युवा विश्वचषकात उतरला होता. पण रविकांतला भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही.

अमित पागनीस : अमितने १९९८ साली झालेल्या दुसऱ्या युवा विश्वचषकात भारताचे कर्णधारपद सांभाळले होते. पण तरीही अमितला भारतीय संघाचे दार ठोठावता आले नाही.

एम. सेंथिलाथन : भारतीय संघ पहिल्यांदाच १९८८ साली युवा विश्वचषकात एम. सेंथिलाथन यांच्या नेतृत्वाखाली खेळला होता. पण एम. सेंथिलाथन यांना भारतीय संघात स्थान मिळाले नाही.