भारतीय महिला संघामधील धडाकेबाज फलंदाज जेमिमा रॉड्रिक्स सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. फलंदाजीसोबतच ती सध्या सिक्स पॅक अॅब्ससाठी मेहनत घेत आहे.
जेमिमाने इन्स्टाग्रामवर स्विमिंग पूलमधील आपले काही फोटो शेअर केले आहेत. त्यामध्ये ती आपली फिट बॉडी दाखवताना दिसत आहे.
तिच्या या फोटोवर कमेंट करताना टोकियो ऑलिम्पिकमधील ब्रॉन्झ मेडलिस्ट आणि भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक पी.आर. श्रीजेश याने ६ पॅक लवकरच येत आहेत, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
जेमिमाने त्याला उत्तर देताना सांगितले की, अण्णा त्यावर काम करण्याचा मी प्रयत्न करत आहे.
तर फॅन्सनी विचारले की, या बिस्किटांचं रहस्य काय आहे.
त्याचं उत्तर देताना भारताच्या या युवा महिला फलंदाजाने सांगितले की, एक्स्ट्रा मॉजेरेला चीजसोबत चीज ब्रस्ट मार्गेरिटा पिझ्झा.
जेमिमा सध्या भारतीय महिला संघासोबत ऑस्ट्रेलियामध्ये आहे. तिला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत संधी मिळाली नव्हती. मात्र ती आपल्या फिटनेसवर खूप लक्ष देत आहे.