Who is Renuka Singh Thakur?, CWG 2022, INDW vs AUSW : ३ वर्षांची असताना वडिलांचे छत्र हरपले, रेणूका सिंग ठाकूरने आज त्यांचे स्वप्न पूर्ण केले, भारतासाठी ऐतिहासिक कामगिरी!

CWG 2022, Indian Women vs Australian Women : १५५ धावांचे लक्ष्य उभे केल्यानंतर भारतीय गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर ( Renuka Singh Thakur ) हिने ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीला हादरवून टाकले. ५ बाद ४९ अशी दयनीय अवस्था झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ कमबॅक करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. पण, एश्लेघ गार्डनर ( Ashleigh Gardner ) हिने एकहाती सामना फिरवला...

CWG 2022, Indian Women vs Australian Women : १५५ धावांचे लक्ष्य उभे केल्यानंतर भारतीय गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर ( Renuka Singh Thakur ) हिने ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीला हादरवून टाकले. ५ बाद ४९ अशी दयनीय अवस्था झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ कमबॅक करेल, असे कुणालाही वाटले नव्हते. पण, एश्लेघ गार्डनर ( Ashleigh Gardner ) हिने एकहाती सामना फिरवला...

ग्रेस हॅरीसने ३७ धावांची खेळी करून ऑसींचा डाव सावरला. त्यानंतर गार्डनरने एलाना किंगसोबत भारतीय गोलंदाजांची धुलाई केली आणि अश्यक्यप्राय विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने ३ विकेट्स व ६ चेंडू राखून हा सामना जिंकला. गार्डनरने ३५ चेंडूंत ९ चौकारांच्या मदतीने नाबाद ५२ धावा करताना ऑस्ट्रेलियाला रोमहर्षक विजय मिळवून दिला. एलाना किंगने १६ चेंडूंत नाबाद १८ धावा केल्या. ऑसींनी १९ षटकांत ७ बाद १५७ धावा करून विजय मिळवला.

भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर ( Harmanpreet Kaur )हिने CWG2022 मध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या पहिल्या खेळाडूचा मान पटकावला. शेफाली वर्मानेही ४८ धावांची वादळी खेळी केली. ऑस्ट्रेलियाची यष्टीरक्षक एलिसा हिली ( Alyssa Healy) हिने या सामन्यात मोठा विक्रम केला. तिने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये यष्टिंमागे १०० बळी टिपण्याचा पराक्रम करताना महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) विक्रम मोडला. या फॉरमॅटमध्ये १०० बळी घेणारी ती पहिली खेळाडू ठरली.

स्मृती मानधना ( २४) व शेफाली यांनी चांगली सुरूवात करून दिली खरी, परंतु डार्सिए ब्राऊनने ही जोडी तोडली. यास्तिका भाटिया ( ८) व शेफाली यांच्यातला ताळमेळ चुकला अन् ऑसींना आयती विकेट मिळाली. जेमिमान रॉड्रिक्सही ११ धावा करून बाद झाली. शेफाली ३३ चेंडूंत ९ चौकारांसह ४८ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार हरमनप्रीतने मोर्चा सांभाळला. तिने ३४ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या.

भारताने ८ बाद १५४ धावा केल्या. इंग्लंडमधील ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भारतीय महिलांची ही सर्वोत्तम खेळी ठरली. यापूर्वी त्यांनी २०२१मध्ये इंग्लंडविरुद्ध ६ बाद १५३ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या जेस जॉनासेनने २२ धावांत ४ विकेट्स घेतल्या.

ऑस्ट्रेलियाची सुरुवात काही फार चांगली झाली नाही. दुसऱ्याच चेंडूव रेणुका सिंग ठाकूरने ऑसींना धक्का देताना एलिसा हिली ( ०) ला झेलबाद केले. त्यापाठोपाठ बेथ मूनी ( १०), कर्णधार मेग लॅनिंग (८) व ताहिला मॅकग्राथ ( १४) यांनी विकेट घेत रेणुकाने ऑस्ट्रेलियाला हादरवून सोडले. रेणुकाने ४ षटकांत १८ धावा देताना ४ महत्त्वाच्या विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ३४ अशी केली. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये डावात ४ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारी रेणूका ही झुलन गोस्वामी ( २०१२) नंतर दुसरी भारतीय मध्यमगती गोलंदाज ठरली.

२६ वर्षीय रेणूका सिंग ठाकूर ही हिमाचल प्रदेश येथील जलदगती गोलंदाज आहे. हिमाचल प्रदेशातील रोहरू शहरातील पार्सा गावातला तिचा जन्म.. तिच्या वडिलांना क्रिकेट खूप आवडायचे, म्हणूनच त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव विनोद कांबळी याच्या नावावरून ठेवले. रेणूका ३ वर्षांची असताना तिच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले. पण, वडिलांची क्रिकेटमधील रूची रेणूकामध्ये आली. १९९९मध्ये तिचे वडील हे हिमाचल प्रदेशच्या Irrigation and Public Health department येथे कामाला होते. वडिलांनंतर आई सुनिता यांनी रेणूका व विनोद यांना वाढवले.