Join us  

इंडियन प्रीमिअर लीग की Injury Premier League? आतापर्यंत 8 खेळाडू झाले दुखापतग्रस्त!

By स्वदेश घाणेकर | Published: September 26, 2020 3:14 PM

Open in App
1 / 10

इंडियन प्रीमिअर लीग ( IPL2020) च्या 13व्या पर्वाला सुरूवात होऊन आज एक आठवडा पूर्ण होईल. दिल्ली कॅपिटल्स संघानं ( Delhi Capitals) सलग दोन विजयासह गुणतक्त्यात अव्वल स्थान पटकावले आहे. चेन्नई सुपर किंग्सची ( Chennai Super Kings) कामगिरी अत्यंत निराशाजनक झालेली आहे.

2 / 10

कोरोना व्हायरसच्या काळात 4-5 महिने क्रिकेटला ब्रेक लागला होता, त्यानंतर IPL 2020ने भारतीय क्रिकेटपटूंसह परदेशातील अनेक खेळाडूंना पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर उतरण्याची संधी दिली. पण, UAEचे तापमान खेळाडूंना मानवत नसल्याचे दिसत आहे. त्यात सामन्यात व सरावात खेळाडूंना झालेल्या दुखापतीनं फ्रँचाझींची डोकेदुखी वाढवली आहे. आतापर्यंत 8 खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत.

3 / 10

ड्वेन ब्राव्हो - चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) हा हुकमी खेळाडू दोन सामन्यांपासून पॅव्हेलियनमध्ये बसून आहे. UAEत दाखल होण्यापूर्वी ब्राव्होनं ( Dwayne Bravo) कॅरेबिनय प्रीमिअर लीग ( CPL 2020) गाजवली. पण, त्यानं स्वतःच्या गुडघ्याला दुखापत करून घेतली आहे आणि तो IPLमध्ये आणखी काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

4 / 10

आर अश्विन ( R Ashwin) - किंग्स इलेव्हन पंजाब ( KXIP) विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या ( Delhi Capitals) या प्रमुख फिरकीपटूला दुखापत झाली. पहिल्याच षटकात त्यानं दोन विकेट्स घेत संघाच्या विजयाचा पाया रचला, परंतु त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर एक धाव वाचवण्यासाठी मारलेली डाईव्ह त्याला महागात पडली आणि प्रचंड वेदनेनं अश्रू गाळत त्याने मैदान सोडले.

5 / 10

नॅथन कोल्टर-नायल ( Nathan Coulter-Nile ) - मुंबई इंडियन्सच्या या गोलंदाजाला दुखापतीमुळे पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागले आहे. IPLमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या लसिथ मलिंगाच्या माघारीनंतर कोल्टर-नायरल MIच्या अंतिम 11मध्ये फिट बसेल असे वाटले होते, परंतु त्याला दुखापत झाली. त्याच्या अनुपस्थितीत जेम्स पॅटिन्सन चांगली कामगिरी करत आहे.

6 / 10

इशांत शर्मा ( Ishant Sharma ) - दिल्ली कॅपटिल्ससाठी ( DC) हा सर्वात मोठा धक्का आहे. इशांतच्या पाठीत दुखत असून त्याला DCच्या दोन्ही सामन्यांत खेळता आलेलं नाही. त्यानं IPLमध्ये 89 सामन्यातं 72 विकेट्स घेतल्या आहेत.

7 / 10

मिचेल मार्श ( Mitchell Marsh ) - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( RCB) विरुद्धच्या पहिल्याच सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला ( SRH) हा मोठा धक्का बसला. मिचेल मार्शला IPL 2020 मधूनच माघार घ्यावी लागली आणि त्याच्या जागी SRHने वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार जेसन होल्डर ( Jason Holder) याची निवड केली आहे.

8 / 10

अंबाती रायुडू ( Ambati Rayudu ) - IPL 2020च्या सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सची ( MI) धुलाई करणारा चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) मधल्या फळीतील फलंदाज नंतरच्या दोन सामन्यांत खेळला नाही. गुडघ्याच्या मागच्या दोन स्नायूंना जोडणारा स्नायू ताणला गेल्यानं तो दोन सामने मैदानाबाहेर आहे. पण, पुढील सामन्यात तो कमबॅक करेल, असा विश्वास कर्णधार MS Dhoniनं व्यक्त केला आहे.

9 / 10

केन विलियम्सन ( Kane Williamson ) - सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघानं पहिल्या सामन्यात अंतिम 11 मध्ये केन विलियम्सनला स्थान न दिल्यानं सर्वांन आश्चर्य वाटलं होतं. सराव सत्रात त्याच्या मांडीला दुखापत झाली आणि त्यामुळे तो मैदानाबाहेर आहे.

10 / 10

ख्रिस मॉरिस ( Chris Morris ) - IPL 2020 Auctionमध्ये 10 कोटी मोजून खरेदी केलेला RCBचा अष्टपैलू खेळाडू अनफिट आहे.

टॅग्स :IPL 2020ड्वेन ब्राव्होआर अश्विन