क्रिकेट कारकिर्द गाजवल्यानंतर अनेक खेळाडूंनी व्यावसायातही उडी मारली आहे. काही जण क्रिकेट प्रशिक्षक, कॉमेंट्रीमध्ये आपलं नशीब आजमावलं, तर काहींनी रेस्टॉरंट आणि हॉटेल व्यावसायात गुंतवणूक केली.
अशीच गुंतवणूक एका क्रिकेटपटूं केली आहे. त्यानं दक्षिण आफ्रिकेतील लेडनबर्ग येथे रिसॉर्ट उभारलं आहे.
त्याच्या या आलिशान रिसॉर्टमध्ये एक रात्री राहण्यासाठी लोकांना 88 हजार रुपये मोजावे लागत आहेत.
निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या रिसॉर्टमध्ये सर्व आलिशान सुविधा आहेत. गोल्फ कोर्सही आहे.
या रिसॉर्टमध्ये एकूण 12 रुम्स आहेत आणि प्रत्येक रुम हे वेगवेगळ्या प्राण्याच्या थीमवर तयार करण्यात आला आहे.
क्रिकेटपटूचे हे उमगानू रिसॉर्ट संपूर्ण दक्षिण आफ्रिकेत प्रचंड फेमस आहे. स्विमिंग पूल, जिम हेही या रिसॉर्टमध्ये आहे.
रिसॉर्टच्या खिडक्या विशाल आहेत की ज्यामधून तुम्हाला जंगली प्राणी सहज पाहता येतील.
आता हे रिसॉर्ट कुणाचं आहे, हा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन याचे हे रिसॉर्ट आहे.
पीटरसननं 104 कसोटीत 8181 धावा केल्या आहेत आणि त्यात 23 शतकांचा समावेश आहे. त्यानं 40 वन डे सामन्यांत 10 शतकांसह 4440 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 50 शतकं आहेत.