Cricket Buzz » फोटो गॅलरी » Shreyas Iyer Mumbai House Inside Photos: मुंबईच्या 'या' हाय-क्लास बिल्डिंगमधील आलिशान घरात राहतो Team Indiaचा श्रेयस अय्यर; शूजसाठीही आहे वेगळं कॅबिनेट, पाहा घराचे फोटोज Shreyas Iyer Mumbai House Inside Photos: मुंबईच्या 'या' हाय-क्लास बिल्डिंगमधील आलिशान घरात राहतो Team Indiaचा श्रेयस अय्यर; शूजसाठीही आहे वेगळं कॅबिनेट, पाहा घराचे फोटोज Open in App Shreyas Iyer भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर याने श्रीलंकेविरूद्ध दमदार कामगिरी केली. टी२० सिरीजमध्ये तो मालिकावीर ठरला तर दुसऱ्या कसोटीत त्याने सामनावीराचा पुरस्कार पटकावला. मात्र आज आपण त्याच्या मैदानाबाहेरील आयुष्याबद्दल म्हणजेच त्याच्या घराबद्दल जाणून घेणार आहोत.
श्रेयस अय्यरने २०२० साली मुंबईतील परेल भागात असलेल्या लोढा क्रेस्ट या टोलेजंग इमारतीत घर विकत घेतलं.
श्रेयसचं ड्रीम होम हे तब्बल २,६१८ फुट इतकं मोठं आणि प्रशस्त आहे.
मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीतील घरासाठी श्रेयसने सुमारे १२ कोटी रूपये मोजले. त्यात २५ लाखांची स्टँप ड्युटीचा समावेश आहे.
श्रेयस मुंबईतील आपल्या घरात आपले आई-वडिल आणि बहिण यांच्यासोबत वास्तव्यास आहे.
श्रेयस बरेच वेळा आपल्या बहिणीबरोबरचे व्हिडीओ किंवा फोटोज इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो.
श्रेयस जेव्हा घरापासून दूर असतो तेव्हा तो त्याच्या आईवडिलांना व बहिणीला खूप मिस करतो असं त्याने एकदा सांगितलं होतं.
श्रेयस शूजचा शौकीन आहे. त्याच्या घरी बुटांचं खूप वेगवेगळं कलेक्शन आहे. महागड्या शूजसाठी त्याने एक वेगळं कपाटच बनवून घेतलं आहे.
श्रेयस अय्यरच्या घरी एक पाळीव कुत्रादेखील आहे. फावल्या वेळात तो त्याच्यासोबत आपला वेळ घालवतो आणि फोटोजही पोस्ट करतो.
क्रिकेटपटूंना फिटनेसचं महत्त्व वेगळं सांगण्याची गरज नाही. श्रेयस स्वत: खूप फिट आहे.
श्रेयसच्या घरातच छोटासा जिमचा सेट अप आहे. जिममधील सर्व उपकरणं त्याने या छोटेखानी रूममध्ये ठेवलेली आहेत.
श्रेयसचं घर खूप उंचावर असल्याने त्याच्या घराच्या बाल्कनीतून विहंगम असं दृश्य दिसतं.
लॉकडाऊन दरम्यान विराट आणि श्रेयस अतिशय जवळच्या बिल्डिंगमध्ये राहत होते. याबद्दल श्रेयस अय्यरने एकदा मुलाखतीत सांगितलं होतं.
श्रेयसने घरी तयार केलेले नीर डोसे विराट कोहलीच्या घरी पाठवले होते आणि त्याला गोड सरप्राईज दिलं होतं. त्यानंतर कोहलीने देखील श्रेयस आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी मशरूम बिर्याणी पाठवली होती.
आणखी वाचा