मुंबई- पंजाबच्या सामन्यात पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला. पण मॅचनंतर घडलेली एक घटना सगळीकडे चर्चेचा विषय आहे.
पंजाबचा प्लेअर केएल राहुलने मॅचनंतर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्याबरोबर जर्सी बदलली. राहुलने मुंबईची जर्सी घातली तर हार्दिकने पंजाबची जर्सी घातली.
खेळाडूवृत्तीने हे सर्व केलं जातं. क्रिकेटमध्ये ही परंपरा नाही पण फुटबॉलमध्ये जर्सी बदलणं खूप प्रसिद्ध आहे.
लोकेश राहुलला जर्सी जमवणं आवडतं. आणि क्रिकेटमध्येही हा ट्रेण्ड यावा यासाठी जर्सी बदलल्याचं राहुल म्हणाला.
जर्सी बदलणं आधी ठरलेलं नव्हतं. सामन्यानंतर अचानक दोघांनी जर्सी बदलली.