Join us

IPL 2018 : महागडे ठरतायत हे ' किंमती ' खेळाडू...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 18:10 IST

Open in App
1 / 4

बेन स्टोक्स : इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सला या हंगामात तब्बल 12.5 कोटी रुपये मोजून राजस्थाव रॉयल्सने आपल्या संघात दाखल केला. पण आतापर्यंतच्या आठ सामन्यांमध्ये त्याला फक्त 148 धावाच करता आल्या आहेत, तर त्याला एकच बळी मिळवता आला आहे.

2 / 4

ग्लेन मॅक्सवेल : दिल्ली डेअरडेव्हिल्सने मोठी रक्कम मोजत ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलला आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. पण मॅक्सवेलला अजूनही चांगली कामिगरी करता आलेली नाही. आतापर्यंतच्या आठ सामन्यांध्ये मॅक्सवेलने फक्त 131 धावा केल्या आहेत.

3 / 4

जयदेव उनाडकट : राजस्थान रॉयल्सने 11.5 कोटी रुपये मोजत जयदेव उनाडकटला आपल्या संघात स्थान दिले आहे. पण आतापर्यंतच्या आठ सामन्यांमध्ये उनाडकटला फक्त सात बळी मिळवता आले आहेत. त्यामुळे सध्याच्या आयपीएलमधला महागडा ठरलेला उनाडकट टीकेचा धनी ठरत आहे.

4 / 4

मनीष पांडे : सनरायझर्स हैदराबादच्या संघाने 11 कोटी रुपये खर्च करून मनीष पांडेचा आपल्या संघात समावेश केला. मनीषने आतापर्यंत सात सामन्यांमध्ये फलंदाजी करताना 158 धावा केल्या आहेत. मनीष पांडेला आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी अजूनही करता आलेली नाही.

टॅग्स :आयपीएल 2018