Cricket Buzz»फोटो गॅलरी »'या' आठ विक्रमांनी यंदाच्या आयपीएलला बनवले संस्मरणीय'या' आठ विक्रमांनी यंदाच्या आयपीएलला बनवले संस्मरणीय By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 1:22 PMOpen in App1 / 10मुंबई, आयपीएल 2019 : दीड महिने निखळ मनोरंजन केल्यानंतर इंडियन प्रीमिअर लीगने रविवारी क्रिकेट चाहत्यांचा निरोप घेतला. मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या 12व्या हंगामात जेतेपदाच मान पटकावला. अंतिम लढतीत त्यांनी चेन्नई सुपर किंग्सवर एका धावेने विजय मिळवून चौथ्यांदा जेतेपदाचा चषक उंचावला. या चषकासह रोहित शर्मा हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार ठरला. त्याच्या नावावर आयपीएलचे पाच जेतेपद आहेत, यापैकी चार जेतेपद त्याने कर्णधार म्हणून उंचावली आहेत. 2 / 10आयपीएलचे हे पहिलेच सत्र असेल की जेथे 13 सामन्यांत प्रत्येक संघाने चारपेक्षा कमी परदेशी खेळाडूंना खेळवले. 3 / 10रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला गुणतालिकेत तळावर समाधान मानावे लागले, परंतु 11 गुणांची कमाई करूनही तळावर राहणारा तो पहिलाच संघ ठरला.4 / 10किंग्स इलेव्हन पंजाबने संपूर्ण हंगामात 32 खेळाडू बदलले आणि आयपीएलच्या इतिहासात असे प्रथमच घडले. या क्रमवारीत दिल्ली कॅपिटल्स ( 23) दुसऱ्या स्थानावर येतो.5 / 10रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या प्रयास रे बर्मन ( 16 वर्ष व 157 दिवस) हा आयपीएलमध्ये पदार्पण करणारा युवा खेळाडू ठरला. शिवाय राजस्थान रॉयल्सच्या रियान परागनेही कमी वयात अर्धशतक झळकावण्याचा विक्रम नोंदवला. 6 / 10डेव्हिड वॉर्नरने पाचव्यांदा आयपीएलच्या एका हंगामात 500 हून अधिक धावा करण्याचा पराक्रम केला. आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 4706 धावा आहेत आणि त्याने ख्रिस गेलला ( 4484) पिछाडीवर टाकले. वॉर्नरने या सत्रात 692 धावा करत ऑरेंज कॅप नावावर केली. यापूर्वी त्याने 528, 562, 848 आणि 641 धावा केल्या होत्या.7 / 10 चेन्नई सुपर किंग्सच्या फिरकीपटूंनी या सत्रात एकूण 62 विकेट्स घेतल्या. इम्रान ताहीर ( 26), हरभजन सिंग ( 16) आणि रवींद्र जडेजा ( 15) यांचा बोलबाला राहिला. ताहिरने एका हंगामात सर्वाधिक 24 विकेट्स घेणाऱ्या फिरकीपटू सुनील नरीनचा विक्रम मोडला. 8 / 10मुंबई इंडियन्सचा जोसेफ अल्झारीने पदार्पणाच्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 12 धावांत 6 विकेट घेतल्या. आयपीएलमधील ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याने राजस्थान रॉयल्सच्या सोहैल तन्वीरचा ( 6/14) विक्रम मोडला.9 / 1010 / 10कोलकाता नाईट रायडर्सने केवळ 56 विकेट्स घेतल्या. 12 ही मोसमातील ही संघाची सर्वात लाजीरवाणी कामगिरी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications