Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPL 2019 : वॉर्नर-बेअरस्टो जोडीनं उठवलं विक्रमांचं वादळIPL 2019 : वॉर्नर-बेअरस्टो जोडीनं उठवलं विक्रमांचं वादळ By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 5:58 PMOpen in App1 / 7जॉनी बेअरस्टो आणि डेव्हिड वॉर्नरच्या वादळी खेळीनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांचा पालापाचोळा केला. त्यांच्या फटकेबाजीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने 20 षटकांत 231 धावा चोपल्या. बेअरस्टोनं 56 चेंडूंत 12 चौकार व 7 षटकार खेचून 114 धावा केल्या, तर वॉर्नरने 55 चेंडूंत 5 चौकार व 5 षटकार खेचून नाबाद 100 धावा केल्या.2 / 716व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दोन धावा घेत बेअरस्टोनं शतक पूर्ण केले. आयपीएलमधील त्याचे हे पहिलेच शतक ठरले. त्याने 52 चेंडूंत 102 धावा चोपल्या.3 / 7डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी हैदराबादकडून सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम नावावर केला. या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 185 धावा केल्या आणि शिखर धवन व केन विलियम्सन यांनी 2018 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध केलेल्या दुसऱ्या विकेटसाठीचा 176 धावांचा विक्रम मोडला. 4 / 7बेअरस्टोनं आयपीएलमधील पहिलेच शतक झळकावले. त्याने 56 चेंडूंत 12 चौकार व 7 षटकार खेचून 114 धावा केल्या.5 / 7वॉर्नरने 55 चेंडूंत 5 चौकार व 5 षटकार खेचून नाबाद 100 धावा केल्या. आयपीएलमधील त्याचे हे चौथे शतक ठरले आणि त्याने शेन वॉटसन आणि विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. या विक्रमात ख्रिस गेल 6 शतकांसह आघाडीवर आहे.6 / 7वॉर्नर आणि बेअरस्टो या जोडीनं पहिल्या विकेटसाठी 185 धावांची भागीदारी करून आयपीएलमध्ये विक्रम केला. त्यांनी गौतम गंभीर व ख्रिस लीन यांचा 2017सालचा 184* धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला.7 / 7एकाच संघाकडून दोन शतकं होण्याची ही आयपीएलमधील दुसरी घटना आहे. याआधी विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स यांनी 2016 मध्ये गुजरात लायन्स संघाविरुद्ध शतक झळकावले होते. आणखी वाचा Subscribe to Notifications