Join us  

IPL 2019 : 'ऑरेंज कॅप'च्या विजेत्यांनाही कोहलीचा 'हा' विक्रम मोडता आलेला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2019 5:01 PM

Open in App
1 / 12

इंडियन प्रीमिअर लीगला ( आयपीएल) 23 मार्चपासून सुरुवात होत आहे. झटपट क्रिकेटच्या या स्वरुपात फलंदाजांचेच वर्चस्व पाहायला मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी फलंदाज विराट कोहली याचं नाणं आयपीएलमध्येही खणखणीत वाजलं आहे. आयपीएलच्या एका सत्रात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अजूनही कोहलीच्याच नावावर आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते आणि या ऑरेंज कॅपच्या मानकऱ्यांनाही कोहलीचा विक्रम मोडता आलेला नाही.

2 / 12

आयपीएलच्या पहिल्या सत्रात किंग्स इलेव्हन पंजाबच्या शॉन मार्शनं ऑरेंज कॅपचा पहिला मान पटकावला. त्याने 11 सामन्यांत 68.44च्या सरासरीनं 616 धावा केल्या होत्या.

3 / 12

2009 मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या मॅथ्यू हेडनने 12 सामन्यांत 144च्या स्ट्राईक रेटने 572 धावा करताना ऑरेंज कॅप जिंकली होती.

4 / 12

महान फलंदाज सचिन तेंडुलकरने 2010 मध्ये मुंबई इंडियन्सकडून 47.53च्या सरासरीनं 618 धावा करत एका सत्रात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर केला होता. त्याने 86 चौकार ठोकले होते.

5 / 12

धावांचा दानव ख्रिस गेलला ट्वेंटी-20 फॉरमॅट नेहमी आवडतो. जगभरातील विविध लीगमध्ये त्यानं आपला दबदबा निर्माण केला आहे. 2011 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना त्याने 12 सामन्यांत 183.13च्या स्ट्राईल रेटने 608 धावा केल्या होत्या.

6 / 12

पाचव्या हंगामातही ख्रिस गेलची बॅट चांगलीच तळपली. त्याने बंगळुरूकडून पुन्हा एकदा जोरदार फटकेबाजी करताना 61च्या सरासरीने 733 धावा केल्या. या खेळीत त्याने 46 चौकार व 59 षटकार खेचले.

7 / 12

2013मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या मायकल हस्सीनं 52 च्या सरासरीनं 733 धावा केल्या.

8 / 12

कोलकाता नाईट रायडर्सच्या रॉबीन उथप्पाने 2014 मध्ये 660 धावा केल्या. त्याने या हंगामात सलग 8 डावांत 40 पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम केला.

9 / 12

सनरायझर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरने 2015 मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला. त्याने 91 धावांच्या सर्वोत्तम खेळीसह 562 धावा चोपल्या.

10 / 12

2016च्या सत्रात विराट कोहलीने असा पराक्रम केला की तो आजपर्यंत कोणालाही करता आलेला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या कर्णधाराने 973 धावांचा पाऊस पाडला. त्याने या खेळीत 16 सामन्यांत 4 शतकं ठोकली.

11 / 12

सनरायझर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरने दहाव्या सत्रात 641 धावा केल्या आणि त्यात 126 धावांच्या सर्वोत्तम खेळीचा समावेश होता.

12 / 12

गतवर्षी सनरायझर्स हैदराबादच्या केन विलियम्सनने सर्वाधिक 735 धावा चोपल्या.

टॅग्स :आयपीएलआयपीएल 2019विराट कोहली