चेन्नईने २०१० साली आयपीएलचे पहिले जेतेपद पटकावले होते.
यापूर्वी २००८ साली झालेल्या अंतिम फेरीत चेन्नईला राजस्थानकडून पराभव पत्करावा लागला होता.
आयपीएलने २०११ साली आयपीएलचे दुसरे जेतेपद पटकावले होते.
चेन्नईला २०१२ साली अंतिम फेरीत कोलकाता नाइट रायडर्सने पराभूत केले होते.
चेन्नईला २०१३ सालीही उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.
मुंबईने २०१३ आणि त्यानंतर २०१५ सालीही चेन्नईवर अंतिम फेरीत विजय मिळवला होता.
चेन्नईने २०१८ साली तिसऱ्यांदा आयपीएलच्या जेतेपदाला गवसणी घातली.