Cricket Buzz»फोटो गॅलरी »आयपीएलमध्ये विराट कोहलीचंच नाणं खणखणीत वाजलं!आयपीएलमध्ये विराट कोहलीचंच नाणं खणखणीत वाजलं! By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 9:42 PMOpen in App1 / 9रॉयल चॅलेंजर बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शुक्रवारी अनेक विक्रमांना गवसणी घातली. 2 / 9कोलकाता नाइट रायडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात त्यानं 17 वी धाव घेताच कोहलीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावांचा पल्ला पार केला. 3 / 9अशी कामगिरी करणारा तो ख्रिस गेल नंतर दुसरा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. त्याने 30 वर्षे व 151 दिवसांत त्याने हा पल्ला गाठला. 4 / 9ट्वेंटी-20त 8000 धावा करणारा कोहली हा सातवा फलंदाज आहे आणि सुरेश रैनानंतर दुसरा भारतीय फलंदाज आहे.5 / 9कोहलीनं 35 वी धाव घेताच भारतीय भूमीत ट्वेंटी-20तील 6000 धावा करण्याचा पराक्रमही नावावर केला. सुरेश रैनानंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा फलंदाज ठरला.6 / 9ख्रिस गेलने 213 सामन्यांत 8000 धावा केल्या, तर कोहलीला हा पल्ला गाठण्यासाठी 243 सामने खेळावे लागले. डेव्हिड वॉर्नर या क्रमवारीत 256 सामन्यांसह तिसऱ्या स्थानावर आहे. 7 / 9विराट कोहलीने 31 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत 7 चौकारांचा समावेश होता. आयपीएलमधील त्याचे हे 39वे अर्धशतक ठरले. आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांत डेव्हिड वॉर्नर ( 42) आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ गौतम गंभीर ( 36), सुरेश रैना ( 36) आणि रोहित शर्मा ( 35) यांचा क्रमांक येतो. 8 / 9कोहलीनं आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही नावावर केला. त्याने सुरेश रैनाचा 5086 धावांचा टप्पा ओलांडला.9 / 9आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्या खेळाडूंमध्ये या दोघांनी आघाडी मिळवली. कोहली व डिव्हिलियर्स यांच्यात 9 शतकी भागीदारी झाल्या आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications