Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPL 2019 : विराट कोहलीचे शतक, राजस्थानविरुद्ध नोंदवला विक्रमIPL 2019 : विराट कोहलीचे शतक, राजस्थानविरुद्ध नोंदवला विक्रम By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2019 10:17 AMOpen in App1 / 9रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची पराभवाची मालिका कायम आहे. मंगळवारी विराट कोहलीच्या संघाला पराभवाची चव चाखावी लागली. राजस्थान रॉयल्सने त्यांच्यावर 7 विकेट राखून मात करताना आयपीएलच्या 12व्या मोसमात पहिल्या विजयाची चव चाखली. या सामन्यात बंगळुरूला हार मानावी लागली असली तरी कॅप्टन कोहलीनं विक्रमी शतक साजरे केले. 2 / 9राजस्थानविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 4 बाद 158 धावा केल्या. पार्थिव पटेल ( 67) आणि मार्कस स्टोइनीस ( 31) यांनी संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. सलामीला आलेल्या कोहलीला 23 धावा करता आल्या.3 / 9राजस्थानने हे लक्ष्य 19.5 षटकांत 7 विकेट राखून पार केले. जोस बटलर ( 59), स्टीव्हन स्मिथ ( 38), राहुल त्रिपाठी (34) आणि अजिंक्य रहाणे ( 22) यांनी उपयुक्त खेळी केली. 4 / 9बंगळुरूचा हा सलग चौथा पराभव ठरल्याने लीगमधील आव्हान टीकवण्यासाठी त्यांना पुढील सर्व सामने जिंकावे लागणार आहेत. पण, या सामन्यात कोहलीनं विक्रम केला.5 / 9कर्णधार म्हणून आयपीएलमधील हा कोहलीचा शंभरावा सामना ठरला आणि अशी कामगिरी करणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. या क्रमवारीत महेंद्रसिंग धोनी ( 162 सामने ) आणि गौतम गंभीर (129) आघाडीवर आहेत. 6 / 9कोहली बंगळुरूकडून 2008 पासून खेळत आहे आणि मागील 7 मोसमात त्याच्याकडेच कर्णधाराची जबाबदारी आहे. मात्र, बंगळुरूला एकदाही आयपीएलचे जेतेपद पटकावता आलेले नाही. 7 / 9बंगळुरूने 2016 मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता आणि ती त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती. त्या मोसमात डेव्हिड वॉर्नरच्या सनरायझर्स हैदराबादने जेतेपद पटकावले होते.8 / 9आयपीएलमध्ये 50 हून अधिक सामन्यांत नेतृत्व करणाऱ्या आठ संघांच्या कर्णधारांमध्ये कोहलीची कामगिरी सर्वात निराशाजनक राहिली आहे. 9 / 9 आणखी वाचा Subscribe to Notifications