Join us

IPL 2019 : आयपीएलच्या पुढच्या हंगामात 'हे' खेळाडू नसतील?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2019 22:39 IST

Open in App
1 / 5

मुंबई इंडियन्सने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत जेतेपद पटकावले. या विजयात अखेरचा चेंडूं अचूक टाकला तो वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने. पण मलिंगाचे वय पाहता तो पुढच्या आयपीएलमध्ये खेळेल, याबद्दल शंका उपस्थित होत आहेत.

2 / 5

चेन्नई सुपर किंग्सच्या शेन वॉटसनने अंतिम फेरीत दमदार अर्धशतक झळकावले. पण वॉटसन पुढच्या आयपीएलमध्ये खेळेल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

3 / 5

युवराज सिंगला या हंगामात मुंबई इंडिन्सने आपल्या ताफ्यात घेतले. पण त्याच्या वाट्याला जास्त सामने आले नाहीत. त्यामुळे यापुढील हंगामात त्याला संधी मिळेल की नाही, याबाबत चर्चा सुरु आहे.

4 / 5

आरसीबीचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला या हंगामात जास्त सामने खेळता आले नाहीत. तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे आगामी आयपीएलमध्ये तो खेळेल की नाही, याबाबत साशंकता आहे.

5 / 5

सनरायझर्स हैदराबादच्या युसूफ पठाणला यंदाच्या हंगामात चमक दाखवता आली नाही. त्यामुळे त्याला पुढच्या हंगामात संधी मिळेल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

टॅग्स :आयपीएल 2019लसिथ मलिंगायुवराज सिंगशेन वॉटसन