7 Days To Go : IPL मधील महेंद्रसिंग धोनीचे हे 'सात' विक्रम तुम्हाला चक्रावून टाकतील!

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( Indian Premier League) 13व्या पर्वाची सुरुवात मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) या सामन्यानं होणार आहे. 19 सप्टेंबरला हा सामना रंगणार आहे आणि आता तो दिवस उजाडण्यासाठी अवघे 7 दिवस राहिले आहेत. आज आपण MS Dhoniच्या सात अशक्यप्राय विक्रमाबाबत जाणून घेणार आहोत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) आता टीम इंडियाच्या ब्लू जर्सीत दिसणार नसला तरी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2020) तो चेन्नई सुपर किंग्सच्या ( Chennai Super Kings) पिवळ्या जर्सीत फटकेबाजी करताना दिसणार आहे.

कर्णधार म्हणून IPLमध्ये 100 सामने जिंकणारा एकमेव कर्णधार...

प्रशिक्षकाचा कर्णधार - IPLमध्ये CSKचा प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग हा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली संघाकडून खेळला आहे.

IPL इतिहासात सर्वाधिक 38 स्पम्पिंगचा विक्रम धोनीच्या नावावर आहे. त्यानंतर दिनेश कार्तिकचा ( 30) क्रमांक येतो.

IPLच्या सर्वाधिक 9 फायनल खेळणारा खेळाडू... 8 वेळा CSKकडून, तर रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून एकवेळा फायनल खेळला.

IPLमध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक 94 झेल व 38 स्पम्पिंग करणारा खेळाडू..

आयपीएलमध्येही डेथ ओव्हरमध्ये सर्वाधिक 2206 धावांचा विक्रम महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आहे. त्यानं 190.50च्या स्ट्राईक रेटनं शेवटच्या चार षटकांत धावा चोपल्या आहेत.

IPLमध्ये 20व्या षटकात मिळून 500हून अधिक धावा करणारा एकमेव खेळाडू ...