Join us  

IPL 2020 : रिक्षा चालकाच्या मुलानं इतिहास घडवला, RCBच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला

By स्वदेश घाणेकर | Published: October 21, 2020 11:35 PM

Open in App
1 / 10

Indian Premier League ( IPL 2020) च्या 13 व्या पर्वात बुधवारी विराट कोहलीच्या ( Virat Kohli) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ( Royal Challengers Bangalore) संघानं कोलकाता नाईट रायडर्सवर ( Kolkata Knight Riders) 8 विकेट राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजीला आलेल्या KKRला 20 षटकांत 8 बाद 84 धावा करता आल्या आणि RCBनं हे लक्ष्य 13.3 षटकांत 2 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले.

2 / 10

या विजयासह RCBनं गुणतालिकेत 14 गुणांसह ( 10 सामने, 7 विजय व 3 पराभव) दुसऱ्या स्थानी झेप घेतली. RCBच्या या विजयात सिंहाचा वाटा उचलला तो मोहम्मद सिराजने ( Mohammed Siraj)....

3 / 10

2019ची आयपीएल सिराजसाठी काही खास ठरली नाही. 9 सामन्यांत त्यानं 7 विकेट्स घेतल्या होत्या आणि 9.55च्या इकॉनॉमीनं धावा दिल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या मोसमात त्याला संधी मिळेल की नाही, याबाबत साशंकता होती. पण, या वर्षभराच्या काळात सिराजनं प्रचंड मेहनत घेतली आणि त्याचे फळ आजच्या सामन्यात पाहायला मिळाले.

4 / 10

कर्णधार विराट कोहलीनंही सामन्यानंतर त्याचे कौतुक केलं. यंदाच्या आयपीएलमध्ये त्यानं 4 सामन्यांत 6 विकेट्स घेतल्या आहेत आणि इकॉनॉमी रेटनही 7.85 एवढा खाली आणला आहे. आजच्या सामन्यात सिराजनं 4 षटकांत 2 निर्धाव षटकं टाकून 8 धावांत 3 विकेट घेतल्या. आयपीएलच्या इतिहासात एका सामन्यात सलग दोन षटकं निर्धाव टाकण्याचा विक्रमही त्यानं नावावर केला.

5 / 10

मोहंम्मद सिराजचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. हैदराबाद येथील एका गरीब कुटुंबातील त्याचा जन्म आणि त्याचे वडील रिक्षाचालक होते. रिक्षाचालक असूनही वडीलांनी सिराजला कधीच काही कमी पडू दिले नाही.

6 / 10

सिराज दिवसभर क्रिकेटचा सराव करायचा, एवढंच नव्हे तर रात्रीही तो सरावासाठी जायचा. जास्त सराव करत असल्यानं त्याला आईकडून अनेकदा मारही खावा लागला आहे. त्याची हिच जिद्द त्याला आयपीएलपर्यंत घेऊन आली.

7 / 10

मोहम्मद सिराजला 2017मध्ये सनरायझर्स हैदराबादनं 2.6 कोटींत आपल्या ताफ्यात घेतले आणि त्यानं मागे वळून पाहिले नाही. त्याच वर्षी त्यानं भारताच्या ट्वेंटी-20 संघातून पदार्पण केलं.

8 / 10

2019मध्ये त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे संघातून पदार्पण केलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर त्याला आपली छाप पाडता आलेली नाही. पण, त्यासाठी तो तयार होत असल्याचे आजच्या कामगिरीनं दिसले.

9 / 10

10 / 10

टॅग्स :IPL 2020रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्स