Join us  

यंदाच्या हंगामात तुटणार आयपीएलमधील सर्वात मोठा विक्रम, या भारतीय खेळाडूकडे आहे सुवर्णसंधी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2020 1:15 PM

Open in App
1 / 8

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामाला अनेक अडथळे पार केल्यानंतर अखेर शनिवारपासून सुरवात होत आहे.

2 / 8

जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीग असलेल्या आयपीएलमध्ये दरवर्षी अनेक विक्रम रचले आणि मोडले जात असतात. यावर्षीही अनेक विक्रमांवर खेळाडूंची नजर असणार आहे. त्यातील एक विक्रम खास असाच आहे. हा विक्रम आहे आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा.

3 / 8

आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेण्याचा विक्रम आतापर्यंत श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लासिथ मलिंगाच्या नावे आहे. मात्र यावेळी मलिंगा आयपीएलमध्ये खेळणार नसल्याने हा विक्रम मोडीत काढण्याची संधी भारताचा अनुभवी फिरकीपटू अमित मिश्राकडे चालून आली आहे.

4 / 8

आयपीएलमध्ये अनेक खेळाडूंना आपल्या फिरकीच्या तालावर नाचवणारा अमित मिश्रा या हंगामात दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळणार आहे. कठीण प्रसंगी भेदक मारा करून सामन्याचे पारडे फिरवणारा खेळाडू म्हणून त्याची खासियत आहे.

5 / 8

आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी टिपण्याचा विक्रम नावावर असलेल्या लासिथ मलिंगाने आतापर्यंत आयपीएलमधील १२२ सामन्यांमध्ये १७० बळी टिपले आहेत. या यादीत अमित मिश्रा दुसऱ्या स्थानी असून, त्याने १४७ सामन्यात १५७ बळी घेतले आहेत. आता मलिंगाच्या सर्वाधिक बळी टिपण्याच्या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी अमित मिश्राला केवळ १३ बळींची गरज आहे.

6 / 8

आयपीएलमधील सर्वात यशस्वी गोलंदाजांमध्ये गणना होणाऱ्या अमित मिश्राच्या नावावर या स्पर्धेत सर्वाधिक तीन हॅट्ट्रिक घेण्याचा विक्रमसुद्धा आहे. मिश्राने २००८ मध्ये दिल्लीकडून खेळताना २०११ आणि २०१३ मध्ये हैदराबादकडून खेळताना हॅटट्रिक घेतली होती.

7 / 8

एका सामन्यात पाच बळी टिपण्याचा विक्रमसुद्धा अमित मिश्राने केलेला आहे. २००८ मध्ये दिल्लीकडून खेळताना डेक्कन चार्जर्सविरुद्धच्या लढतीत मिश्राने १७ धावा देऊन ५ बळी टिपले होते.

8 / 8

तसेच एका डावात चार बळी टिपण्याची कमाल अमित मिश्राने आतापर्यंत चारवेळा केली आहे. त्याने २००८, २०११, २०१३ आणि २०१६ मध्ये एकाच सामन्यात चार बळी टिपले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामातही क्रिकेटप्रेमींना अमित मिश्राकडून अशाच धमाकेदार कामगिरीची अपेक्षा असेल.

टॅग्स :आयपीएल 2020इंडियन प्रीमिअर लीगभारत