Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPL 2020 : पहिले षटक कसे राहिले? पहिली धाव कुणी काढली?IPL 2020 : पहिले षटक कसे राहिले? पहिली धाव कुणी काढली? By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 5:53 AMOpen in App1 / 13IPL 2020 : (ललित झांबरे) : आयपीएलच्या १३ व्या सत्राला आता काही तासांतच सुरुवात होणार आहे. कोणत्याही गोष्टीची सुरुवात महत्त्वाची असते. त्याप्रमाणे यंदा कोरोनामुळे आधीच संकटात सापडलेल्या आणि युएईमध्ये स्थलांतरीत करावे लागलेल्या आयपीएलची सुरुवात कशी होईल याची आणि यंदाची पहिली धाव कोण घेईल याची प्रचंड उत्सुकता आहे.2 / 13आयपीएलचा इतिहास सुरु झाला. तो १८ एप्रिल २००८ रोजी. त्या दिवशी बंगळुरू येथे पहिला चेंडू आरसीबीच्या प्रवीण कुमारने कोलकाता नाईट रायडर्सच्या सौरव गांगुलीला टाकला आणि त्यावर लेग बायची धाव निघाली. त्यानंतर त्याच षटकात केकेआरला आणखी दोन धावा मिळाल्या. त्यात एक होती वाईडची आणि दुसरी पुन्हा लेग बायची. याप्रकारे आयपीएलच्या इतिहासातील पहिल्या षटकात बॅटने एकही धाव निघाली नव्हती मात्र पहिल्या षटकाअखेर स्कोअर होता बिनबाद ३ . बॅटीने पहिली धाव निघाली ती आठव्या चेंडूवर आणि तो होता ब्रेंडन मॅक्क्युलमचा खणखणीत चौकार जो त्याने झहीर खानला लगावला होता. त्याच्या पुढचे तीन चेडूही मॅक्क्युलमने चौकार, षटकार व चौकारासाठी फटकावत भविष्यात आयपीएलमध्ये काय असेल याची झलक दाखवली. 3 / 13दुसऱ्या आयपीएलची सुरुवात दक्षिण आफ्रिकेत केपटाऊनला १८ एप्रिल २००९ रोजी झाली. त्यावेळी पहिल्याच चेंडूवर मुंबई इंडियन्ससाठी सनथ जयसुर्याने एक धाव घेतली. सीएसकेच्या मनप्रीत गोनीने टाकलेल्या या षटकात तीन धावा निघाल्या.4 / 13तिसऱ्या आयपीएलचे पहिले षटक १२ मार्च २०१० रोजी मुंबई येथे अतिशय सनसनाटी राहिले. यात डेक्कन चार्जरच्या चमिंडा वासने पहिल्याच चेंडूवर केकेआरच्या मनिष तिवारीला मिडविकेटकडे रोहित शर्माच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. हा धक्का कमी होता की काय तर चौथ्या चेंडूवर ‘दादा’ सौरव गांगुलीची विकेट काढली. फळ्यावर एकही धाव नसताना केकेआरचे दोन गडी माघारी परतले. पहिल्या षटकाअखेर दोन बाद एक असा केकेआरचा स्कोअर होता. यावेळी पहिली धाव निघाली ती नवव्या चेंडूवर आणि तो होता चेतश्वर पुजाराने लगावलेला चौकार!5 / 13२०११ च्या आयपीएलची पहिली धाव ८ एप्रिल २०११ रोजी चेन्नइ येथे दुसऱ्या चेंडूवर निघाली. सीएसकेच्या श्रीकांत अनिरुध्दने केकेआरचा डावखुरा फिरकीपटू इकबाल अब्दुल्लाचा चेंडू मिड आॅफकडे काढून ही धाव मिळवली. पाचव्या चेंडूवर मुरली विजयने चौकार लगावला पण पुढल्याच चेडूवर तो बाद झाला आणि १ बाद ५ या स्कोअरवर पहिले षटक संपले.6 / 13४ एप्रिल २०१२ रोजी पाचव्या आयपीएलचा पहिला चेंडू मुंबई इंडियन्सच्या लसिथ मलिंगाने टाकला जो वाईड होता. दुसऱ्या वैध चेंडूवर फाफ डू प्लेसीसने तीन धावा काढत सीएसकेचे खाते खोलले पण आणखी एक चेंडू खेळल्यावर अंबाती रायुडूच्या थेट फेकीने प्लेसीसला धावबाद केले आणि पहिले षटक १ बाद ५ या धावसंख्येवर संपले.7 / 13तिसऱ्या आयपीएलप्रमाणेच सहाव्या आयपीएलचीही सुरुवात २०१३ मध्ये सनसनाटी झाली. केकेआरच्या ब्रेट लीने पहिल्याच चेंडूवर दिल्लीच्या उन्मुक्त चंदची दांडी उडवली. त्यानंतर जयवर्धने व वॉर्नरने चौकार लगावल्याने पहिल्या षटकाअखेर धावसंख्या एक बाद ९ राहिली.8 / 13२०१४ च्या आयपीएलचा पहिला सामना १६ एप्रिल रोजी अबुधाबी येथे खेळला गेला. त्यात केकेआरच्या गौतम गंभीरला मुंबई इंडियन्सच्या झहीरखानने पुरते जखडून ठेवले. गंभीरला पूर्ण षटकात एकही धाव काढता आली नाही. फक्त एक धाव वाईडची मिळाली. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बॅटीने पहिली धाव निघाली ज्यावेळी जेकस कॅलिसने दोन धावा काढल्या.9 / 13२०१५ च्या आयपीएलचे पहिले षटक साधारणच राहिले. ८ एप्रिल रोजी केकेआरच्या उमेश यादवने कोलकाता येथे टाकलेल्या या षटकात चार एकेरी धावा निघाल्या. त्यात पहिली धाव मुंबई च्या रोहित शर्माने दुसऱ्या चेंडूवर घेतली.10 / 13२०१६ च्या आयपीएलच्या पहिल्या षटकात मुंबई च्या रोहित शर्माच्या चौकारासह बिनबाद ८ धावा निघाल्या. मुंबई येथे रायझिंग पुणेच्या आरपी सिंगने हे षटक टाकले. त्यात लेंडल सिमन्सने पहिल्याच चेंडूवर एक धाव घेतली.11 / 13२०१७ च्या पहिल्या षटकात डेव्हिड वॉर्नरच्या चौकारासह सनरायझर्स हैदराबादने बिनबाद ७ धावा केल्या. आरसीबीच्या टायमल मिल्सला लगावलेला हा चौकार हीच या सत्राची पहिली धाव होती.12 / 13२०१८ च्या सत्राला सुरुात करताना मुंबई इंडियन्सच्या रोहित शर्माला चेन्नईच्या दीपक चाहरने सलग तीन चेडूवर चकवले. त्यानंतर रोहितने खणखणीत चौकारासह उत्तर दिले. पहिल्या षटकाअखेर मुंबई च्या बिनबाद ५ धावा होत्या.13 / 13गेल्या वर्षी २३ मार्चला चेन्नई येथे आरसीबीच्या विराट कोहलीने पहिल्याच चेंडूवर घेतलेल्या एका धावेसह आयपीएलच्या तपपूर्ती सत्राची सुरुवात झाली. चेन्नई च्या दीपक चाहरच्या या षटकात पाच धावा निघाल्या. आणखी वाचा Subscribe to Notifications