Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPL 2020 चा सामना पाहण्यासाठी अभिनेत्री थेट UAEत पोहोचली; चुकवला अनेकांच्या काळजाचा ठोका!IPL 2020 चा सामना पाहण्यासाठी अभिनेत्री थेट UAEत पोहोचली; चुकवला अनेकांच्या काळजाचा ठोका! By स्वदेश घाणेकर | Published: October 03, 2020 6:09 PMOpen in App1 / 9Indian Premier League ( IPL 2020) मध्ये चेन्नई सुपर किंग्सला ( Chennai Super Kings) सलग तिसरा पराभव पत्करावा लागला आहे. सनरायझर्स हैदराबादनं ( Sunrisers Hyderabad) चेन्नईवर ७ धावांनी विजय मिळवला. 2 / 9प्रियम गर्गची शानदार अर्धशतकी खेळी आणि गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे SRHनं हा विजय मिळवला. या विजयामुळे हैदराबादचा संघ आता गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. तर सलग तिसऱ्या पराभवामुळे चेन्नई गुणतालिकेत तळाला आहे.3 / 9SRHसाठी प्रियम गर्ग आणि अभिषेक शर्मानं पाचव्या विकेटसाठी ७७ धावांची भागिदारी रचली. गर्गनं २६ चेंडूंत ५१ धावांची नाबाद खेळी केली. यामध्ये ६ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याला शर्मानं २४ चेंडूंत ३१ धावा काढून चांगली साथ दिली. हैदराबादनं २० षटकांत ५ बाद १६४ धावा केल्या. 4 / 9हैदराबादनं २० षटकांत ५ बाद १६४ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि रविंद्र जाडेजानं पाचव्या विकेटसाठी ७२ धावांची भागिदारी रचत संघाच्या आशा पल्लवित केल्या. जाडेजानं ३५ चेंडूंत ५० धावांची खेळी साकारली. धोनी ३६ चेंडूंत ४७ धावा काढून नाबाद राहिला. चेन्नईला २० षटकांत ५ बाद १५७ धावाच करता आल्या. 5 / 9पण, हा सामना पाहण्यासाठी भारतीय अभिनेत्री UAEत दाखल झाली आणि तिचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला.6 / 9अश्रिता शेट्टी असे त्या अभिनेत्रीचे नाव असून ती भारतीय संघाचा मधल्या फळीचा फलंदाज मनीष पांडे याची पत्नी आहे.7 / 9मनीष पांडे व अश्रिता शेट्टी यांनी मुंबईत 2 डिसेंबर 2019 मध्ये विवाह केला.8 / 930 वर्षीय मनीषने दाक्षिणात्य अभिनेत्रीशी विवाह केला. मागील काही कालावधीपासून अश्रिता आणि मनीष हे रिलेशनशिपमध्ये आहेत. अश्रिता ही दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील मोठी अभिनेत्री आहे.9 / 926 वर्षी अश्रितानं Indrajith, Oru Kanniyum Moonu Kalavaanikalum आणि Udhayam NH4 आदी अनेक चित्रपटांत काम केले आहे. लवकरच ती आर पन्नीर्सेलवम यांच्या दिग्दर्शीत चित्रपटातही दिसणार आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications