IPL 2020 MI vs CSK Latest News : मुंबई इंडियन्सचे पारडे जड; ही सात कारणं MI ला CSKविरुद्ध ठरवतात 'दादा'

मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. 19 सप्टेबंर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.

मुंबई इंडियन्सच्या ( MI) वाट्याला सलामीचा सामना येणं हे त्यांच्यासाठी फार चांगली गोष्ट नक्कीच नाही. दुसरीकडे CSKच्या चमूत तणावाचे वातावरण असले तरी Opening Match खेळायला मिळणे हे शुभसंकेत म्हणावे लागतील.

असे असले तरी आजच्या सामन्यात 7 कारणांनी रोहित शर्माचा ( Rohit Sharma) MI संघ महेंद्रसिंग धोनीच्या ( MS Dhoni) CSKपेक्षा वरचढ ठरतो.

1) महेंद्रसिंग धोनी हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. IPLमध्येही धोनीचे कर्णधारपदाची विक्रम मोडणे अशक्य आहेत. पण, जेतेपदाच्या बाबतीत रोहित शर्मा हा वरचढ ठरतो. IPLमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या टक्केवारीत धोनी अव्वल स्थानी आहे, तर रोहित तिसऱ्या स्थानी आहे.

2) IPL 2020च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सनं ( CSK) महेंद्रसिंग धोनी ( 39), सुरेश रैना ( 33), अंबाती रायुडू ( 31), हरभजन सिंग ( 40) आणि ड्वेन ब्राव्हो ( 36) या खेळाडूंना ताफ्यात कायम राखले. रैना आणि भज्जी यांनी माघार घेतली असली तरी CSKकडे अनेक अनुभवी खेळाडू आहेत. दुसरीकडे MIकडे हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि जसप्रीत बुमराह ही युवा खेळाडूंची फळी आहे. यांच्याशिवाय कृणाल पांड्या व राहुल चहर हेही युवा फिरकीपटू संघाकडे आहेत. सूर्यकुमार यादव, इशान किशन आदी युवा शिलेदार CSKवर भारी पडू शकतात.

3) मुंबई इंडियन्स ( MI) आणि चेन्नई सुपर किंग्स ( CSK) यांच्यात एकूण 30 सामने झाले आहेत. त्यापैकी मुंबई इंडियन्सने 18, तर चेन्नई सुपर किंग्सने 12 सामने जिंकले आहेत. मुंबईने घरच्या मैदानावर 12 विजय मिळवले आहेत. मागील पाच सामन्यांत मुंबई इंडियन्सनं 5-0 अशी बाजी मारली आहे.

4) चेन्नई सुपर किंग्सकडे ( CSK) डेथ ओव्हरमध्ये मुंबई इंडियन्सच्या ( MI) फिनिशर्सला रोखण्याची क्षमता नाही. मुंबई इंडियन्सकडे हार्दिक पांड्या आणि किरॉन पोलार्ड हे तगडे फिनिशर आहेत. CSKविरुद्ध मुंबई इंडियन्सनं 19 व 20 व्या षटकात 191च्या स्ट्राईक रेटनं धावा चोपल्या आहेत.

5) CSKला यंदा नशिबाची साथही मिळत नाही. पहिल्या सामन्यात जोश हेझलवूड आणि सॅम कुरन यांना खेळता येणार नाही. त्यामुळे त्यांची गोलंदाजी कमकुवत झाली आहे.

6) सुरेश रैना आणि हरभजन सिंग हे अनुभवी खेळाडूही नसल्यानं CSKची डोकेदुखी वाढू शकते.

7) कागदावर मुंबई इंडियन्सचा संघ तगडा दिसत आहे.

Read in English