Join us  

IPL 2020 MI vs CSK सामन्यासाठी आहात सज्ज?; मग रोहित शर्माच्या संघाच्या या गोष्टी जाणून घेतल्याच पाहिजेत!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 5:05 PM

Open in App
1 / 16

इंडियन प्रीमिअर लीगमधील ( Indian Premier League) दोन सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्स ( Chennai Super Kings) हे IPL2020च्या सलामीच्या सामन्याला 19 सप्टेंबरला एकमेकांशी भिडणार आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटात लॉकडाऊनमुळे सर्वांना घरीच रहावे लागले.

2 / 16

त्यात क्रीडा स्पर्धाही रद्द झाल्यामुळे त्यांच्या मनोरंजनाचा हक्काचं व्यासपीठही नव्हते. पण, आता IPL2020 सुरू होत असल्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहेत. आपापल्या संघांना चिअर करण्यासाठी प्रत्येक जण तयारीला लागले आहेत. त्यात MIvsCSK हा Opening सामना म्हणजे जणू पर्वणीच.

3 / 16

MIने चार वेळा, तर CSKने तीनवेळा IPL जेतेपद जिंकले आहेत आणि त्यामुळे यो दोन्ही संघांची टशन पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. हा सामना पाहण्यापूर्वी MI संघांबद्दल 10 मजेशीर गोष्टी जाणून घ्या, त्याने तुमचाच फायदा होईल.( Interesting IPL facts about MUMBAI INDIANS)

4 / 16

इंडियन प्रीमिअर लीगमधील सर्वात महागड्या (most expensive ) संघाचा मान मुंबई इंडियन्सला ( MI) जातो. Reliance groupने 826 कोटी 12 लाख 99,200 रुपयांत ही फ्रँचायझी घेतली. उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी नीता अंबानी या ह्या संघाच्या मालकिण आहेत.

5 / 16

IPLच्या पहिल्या व दुसऱ्या पर्वात सर्वाधिक पाहिला गेलेल्या संघांचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. एकूण 239 मिलियन व्ह्यूअर्स या संघाला मिळाले होते.

6 / 16

मुंबई इंडियन्स हा IPL मधील सर्वात यशस्वी संघ आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. MI ने 2013, 2015, 2017 आणि 2019मध्ये जेतेपद पटकावले आहे. पण, यासह त्यांच्या नावावर चॅम्पियन्स लीग ट्वेंटी-20 ( 2011) चेही जेतेपद आहे.

7 / 16

कोलकाता नाइट रायडर्स ( Kolkata Knight Riders) हे मुंबई इंडियन्सचे फेव्हरिट प्रतिस्पर्धी आहेत. KKR विरुद्ध MIची विजयाची टक्केवारीह ही 76 इतकी आहे. MIने 25 पैकी 19 सामन्यांत विजय मिळवला, तर 6 सामने पराभूत झाले.

8 / 16

सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) या संघांनं MIविरुद्ध सर्वाधिक यश मिळवले आहेत. 14 पैकी 7 सामने मुंबईने गमावले आहेत, तर 1 सामना बरोबरीत सुटला होता.

9 / 16

सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवणाऱ्या तीन संघांमध्ये ( KXIP व RR) मुंबई इंडियन्सचा समावेश आहे. मुंबईनं दोन वेळा सुपर ओव्हर खेळली आणि दोन्ही वेळेस त्यांनी विजय मिळवला.

10 / 16

IPLमध्ये सर्वाधिक 1035 विकेट्स घेणारा मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे. आतापर्यंत एकही संघाला 1000 विकेट्सचा पल्ला गाठता आलेला नाही.

11 / 16

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी IPL मध्ये सर्वाधिक 34 षटकं निर्धाव टाकली आहेत. IPLमधील नकोसा विक्रमही MIच्या नावावर आहेत. त्यांनी सर्वाधिक 104 नो बॉल टाकण्याचा विक्रम केला आहे.

12 / 16

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांच्या नावावर चार वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम आहे. इतरांच्या तुलनेत ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

13 / 16

IPLमध्ये नियमानुसार अंतिम 11मध्ये चार खेळाडूच खेळू शकतात, परंतु 2011मध्ये मुंबई इंडियन्सचे पाच परदेशी खेळाडू खेळवले होते. संघातील बरेच भारतीच खेळाडू दुखापतग्रस्त होते.

14 / 16

मुंबई इंडियन्सचा गोलंदाज लसिथ मलिंगा याच्या नावावर सर्वाधिक 170 विकेट्स आहेत. त्याने एकदा पाच विकेट्स, तर सहावेळा चार विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

15 / 16

UAEत मुंबईची कामगिरी निराशाजनक झालेली आहे. 2014मध्ये इथे खेळलेल्या पाचही सामन्यांत त्यांना हार पत्करावी लागली.

16 / 16

टॅग्स :आयपीएल 2020मुंबई इंडियन्सरिलायन्सनीता अंबानी