Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPL 2020 : मुंबई इंडियन्सनं खेळाडूंसाठी बूक केलंय आलिशान हॉटेल; RCB, CSKचा कमी नाही थाट!IPL 2020 : मुंबई इंडियन्सनं खेळाडूंसाठी बूक केलंय आलिशान हॉटेल; RCB, CSKचा कमी नाही थाट! By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 11:54 AMOpen in App1 / 9इंडियन प्रीमिअर लीगचा ( आयपीएल 2020) 13वा मोसम संयुक्त अरब अमिराती येथे 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात 8 फ्रँचायझी खेळाडूंसह युएईत दाखल होतील. पुढील तीन महिने दुबई आणि अबु धाबी येथे फ्रँचायझी आणि बीसीसीआयचा बेस कॅम्प असणार आहे. आयपीएलचे काही सामने शाहजाह येथे होणार आहेत, परंतु एकाही फ्रँचायझीनं तिथे राहण्याची उत्सुकता दाखवली नाही. 2 / 9आता तीन महिने युएईत राहायचे म्हटले, तर खेळाडूंसाठी सर्व सुविधांची पूर्तता करणेही गरजेचे आहे. सर्व संघ अबु धाबी आणि दुबई येथील 7 आलिशान हॉटेल्समध्ये राहणार आहेत आणि त्यापैकी अनेकांनी समुद्र किनारी असलेल्या हॉटेल्सना पसंती दर्शवली आहे. दुबईतील ओबेरॉय हे बीसीसीआयसाठीचे अधिकृत हॉटेल आहे. आता पाहूया 3 / 9बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानसाठी दुबई आणि अबु धाबी हे दुसरं घरचं आहे. शाहरुखनं संयुक्त अरब अमिरातीत मोठी गुंतवणूक केली असल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे मालकी हक्क असलेला कोलकाता नाइट रायडर्स संघासाठी त्यानं आलिशान हॉटेल बूक केलं आहे. 21 ऑगस्टला कोलकाताचा संघ मुंबईहून दुबईसाठी रवाना होणार आहे.4 / 9कोलकाता नाइट रायडर्सच्या खेळाडूंसाठी ग्रँड कनाल येथील रित्झ कार्ल्टोन अबु धावी येथे राहण्याची सोय केली आहे. 57 एकर गार्डन आणि स्विमिंग पूल असलेलं हे हॉटेल विमानतळापासून 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. 5 / 9महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्सचा संघ 21 ऑगस्टला दुबईसाठी रवाना होईल. येथील ताज दुबईत येथे ते राहणार आहेत. CSKनं या हॉटेलचं संपूर्ण एक फ्लोअर बूक केलं आहे.6 / 9रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ दुबईतील वॅलडॉर्फ अॅस्टोरिया येथे थांबणार आहे. 7 / 9सनरायझर्स हैदराबाद संघ दुबईतील रित्झ कार्ल्टोन येथे राहणार आहे. 8 / 9किंग्स इलेव्हन पंजाबचा संघ दुबईतील सोफिटेल दी पाल्म येथे राहणार आहे. 9 / 9मुंबई इंडियन्सचा संघ अबु धाबी येथील सेंट रेगीस येथे राहणार आहे. मॅरियट ग्रुपची ही प्रॉपर्टी असून यंदाचे मुंबई इंडियन्सचे स्पॉन्सर्स आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications