Join us  

IPL 2020 : मुंबई इंडियन्सनची 'स्मार्ट रिंग' देणार कोरोनाशी लढा!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2020 5:17 PM

Open in App
1 / 12

इंडियन प्रीमिअर लीगला ( आयपीएल) सुरुवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्स ( CSK) चे दोन खेळाडूंसह 13 सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. त्यामुळे स्पर्धेवर संकट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. पण, क्वारंटाईन कालावधीनंतर CSKच्या खेळाडूंची पुन्हा चाचणी करण्यात आली आणि त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.

2 / 12

कोरोनाचा सामना करण्यासाठी बीसीसीआयनं बायो-बबल तयार केले आहेत आणि सर्व संघ त्याचे काटेकोर पालन करत आहेत. पण, या सर्वांत मुंबई इंडियन्सनं एक पाऊल पुढे टाकले आहे.

3 / 12

गतविजेत्या मुंबई इंडियन्सनं कोरोनाशी लढा देण्यासाठी 'स्मार्ट रिंग'चा वापर केला आहे. सध्या दुबईत असलेल्या सर्व आयपीएल फ्रँचायझींमध्ये मुंबई इंडियन्सच्या स्मार्ट रिंगची चर्चा आहे.

4 / 12

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी सरावाला कसून सुरुवात केली आहे. फ्रँचायझींना बीसीसीआयनं ब्लूतूथ डिव्हाईस दिले आहेत. त्यावर प्रत्येकाला रोजचं फिटनेस अपडेट द्यावं लागतं.

5 / 12

मुंबई इंडियन्सनं एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी खेळाडूंना स्मार्ट रिंग दिले आहेत.

6 / 12

ही रिंग खेळाडूच्या आरोग्याशी संबंधित सर्व महत्वाच्या घटकांची माहिती घेते. त्याच्या शरिराचं तापमान, नाडीचे ठोके, हार्ट रेट अशा सर्व गोष्टींची माहिती या रिंगमधून मिळणार आहे.

7 / 12

एखाद्या खेळाडूच्या शाररिक हालचालींध्ये काही वेगळेपण जाणवलं किंवा त्याच्यात कोणत्याही प्रकारची लक्षण आढळत असतील तर या रिंगच्या माध्यमातून ते समजू शकतं.

8 / 12

त्यानंतर त्या खेळाडूवर स्वतंत्रपणे उपचार केले जाऊ शकतात. NBA च्या स्पर्धांमध्येही अशाच पद्धतीच्या रिंगचा वापर होतो,असे सूत्रांनी सांगितले.

9 / 12

मुंबई इंडियन्सनं खेळाडूंसाठी 15000 स्क्वेअर फिट मनोरंजन रूम तयार केले आहे.

10 / 12

11 / 12

12 / 12

टॅग्स :मुंबई इंडियन्सआयपीएल 2020