Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPL 2020 Prize Money : आयपीएलच्या १३व्या पर्वातील विजेत्याचा आर्थिक तोटा; मिळणार निम्मीच बक्षीस रक्कम!IPL 2020 Prize Money : आयपीएलच्या १३व्या पर्वातील विजेत्याचा आर्थिक तोटा; मिळणार निम्मीच बक्षीस रक्कम! By स्वदेश घाणेकर | Published: November 08, 2020 4:36 PMOpen in App1 / 8इंडियन प्रीमिअर लीगच्या ( IPL 2020) १३व्या पर्वाचा अंतिम सामना १० नोव्हेंबरला होणार आहे. मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला आहे, तर दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) आणि सनरायझर्स हैदराबाद ( Sunrisers Hyderabad) यांच्यातल्या सामन्यातून दुसरा फायनलिस्ट ठरणार आहे. 2 / 8यंदाच्या आयपीएल विजेत्या संघाला २०१९च्या आयपीएल विजेत्या संघाला मिळालेल्या बक्षीस रक्कमेतील ५०टक्केच रक्कम मिळणार आहे. २०१९मध्ये मुंबई इंडियन्सनं ( MI) जेतेपद पटकावलं होतं आणि त्यांना २० कोटी बक्षीस रक्कम मिळाली होती, परंतु यंदाच्या विजेत्याला फक्त १० कोटी दिले जाणार आहेत.3 / 8आयपीएलमध्ये कॉस्ट कटिंगची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यंदा विजेत्या संघाला १० कोटी बक्षीस म्हणून मिळतील. २०१९च्या विजेत्या संघाला २० कोटी देण्यात आले होते, असे बीसीसीआयनं सांगितले होते.4 / 8त्यात भारत-चीन सीमेवरील वाढत्या तणावामुळे Vivo ने टायटल स्पॉन्सरमधून माघार घेतली. Dream 11नं टायटल स्पॉन्सरशीप मिळवली, परंतु ती Vivoच्या तुलनेत निम्म्या किमतीत. 5 / 8त्यामुळे यंदाच्या विजेत्या संघाला १० कोटी दिले जाणार आहेत. शिवाय उपविजेत्याला १२.५ कोटींऐवजी ६.२५ कोटीच मिळणार आहेत.6 / 8आयपीएलमध्ये कॉस्ट कटिंगची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यंदा विजेत्या संघाला १० कोटी बक्षीस म्हणून मिळतील. २०१९च्या विजेत्या संघाला २० कोटी देण्यात आले होते, असे बीसीसीआयनं सांगितले होते.7 / 8उपविजेत्या संघाला १२.५ कोटी ऐवजी ६.२५ कोटी देण्यात येणार आहेत, अशी माहिती बीसीसीआयनं पीटीआयला दिली होती. 8 / 8क्वालिफायर सामन्यातील दोन संघांना प्रत्येकी 4.375 कोटी रुपये मिळणार आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications