कर्णधार रोहित शर्मा यंदाही सलामीलाच खेळेल.
क्विंटन डी कॉक याने मुंबई इंडियन्सकडून चांगली कामगिरी केली आहे.
ख्रिस लीनला यंदा मुंबई इंडियन्सने दोन कोटीच्या मूळ किमतीत आपल्या ताफ्यात घेतले.
सूर्यकुमार यादवची बॅट यंदा चांगलीच तळपली आहे. त्यानं स्थानिक क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली आहे.
इशान किशन याला यंदा सर्व सामने खेळण्याची संधी मिळू शकते.
हार्दिक पांड्याने दुखापतीतून सावरताना डी व्हाय पाटील ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये दोन शतकी खेळी केल्या आहेत.
कृणाल पांड्या हा आणखी एक अष्टपैलू खेळाडूचा पर्याय संघाकडे आहे.
किरॉन पोलार्डने 500 ट्वेंटी-20 सामने खेळण्याचा पराक्रम केला आहे.
जसप्रीत बुमराह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये साजेशे पुनरागमन करण्यात अपयशी ठरला असला तरी आयपीएलमधूल त्याचे मनोबल उंचावू शकते.
लसिथ मलिंगा हा हुकूमी एक्का मुंबई इंडियन्सकडे आहे.
राहुल चहर हा एक पर्याय आहे. शिवाय नॅथन कोल्टर नील आणि ट्रेंट बोल्ट हे तगडे गोलंदाजही त्यांच्याकडे आहेत.