Cricket Buzz»फोटो गॅलरी »IPL 2020 : कोहलीनंतर महेंद्रसिंग धोनी सर्वाधिक कमावतो, जाणून घ्या CSKकडून कोणाला किती पगार मिळतोIPL 2020 : कोहलीनंतर महेंद्रसिंग धोनी सर्वाधिक कमावतो, जाणून घ्या CSKकडून कोणाला किती पगार मिळतो By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2020 10:12 AMOpen in App1 / 13केदार जाधव - 2018च्या लिलावात CSKनं केदार जाधवसाठी 7.8 कोटी खर्च केले. 2 / 13शेन वॉटसन - 38 वर्षीय अष्टपैलू खेळाडूसाठी CSKनं 2018च्या लिलावात 4 कोटी मोजले. त्यानं 2018च्या अंतिम सामन्यात 57 चेंडूंत नाबाद 117 धावांची खेळी करून CSKला जेतेपद जिंकून दिलं होतं.3 / 13ड्वॅन ब्राव्हो - 2018च्या लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबनं त्याला 6.4 कोटींत घेतले, परंतु CSKनं Right to Match कार्ड वापरून त्याला आपय्ला ताफ्यात घेतले.4 / 13सॅम कुरण - आयपीएल 2020 साठीच्या लिलावात CSKनं सॅम कुरणला 5.5 कोटीत घेतले. 2019च्या आयपीएलमध्ये तो किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळला होता.5 / 13फॅफ ड्यू प्लेसिस - CSKनं आपलं ट्रम्प कार्ड वापरून फॅफ ड्यू प्लेसिसला 2018च्या लिलावात किंग्स इलेव्हन पंजाबकडून 1.6 कोटींत घेतले.6 / 13कर्न शर्मा - CSKनं कर्न शर्मासाठी 5 कोटी मोजले.7 / 13मुरली विजय - 2 कोटी8 / 13अंबाती रायुडू - 2.2 कोटी 9 / 13पीयूष चावला - आयपीएल 2020साठीच्या लिलावात CSKनं त्याच्यासाठी 6.75 कोटी रुपये मोजून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. 10 / 13हरभजन सिंग - 2008नंतर प्रथमच आयपीएल लिलावात आलेल्या हरभजनला चेन्नई सुपर किंग्सनं 2 कोटीच्या मूळ किंमतीत घेतले. त्यानं चेन्नईसाठी 24 सामन्यांत 23 विकेट्स घेतल्या आहेत. यंदाच्या आयपीएलनंतर भज्जी निवृत्ती घेण्याची शक्यता आहे.11 / 13रवींद्र जडेजा - 31 वर्षीय रवींद्र जडेजाला 2012मध्ये चेन्नई सुपर किंग्सनं 9.72 कोटींत आपल्या ताफ्यात घेतले होते. पण, 2018मध्ये त्याला कायम राखताना संघानं 7 कोटी मोजले.12 / 13सुरेश रैना - चेन्नई सुपर किंग्सनं धोनीनंतर सुरैश रैनाला पसंती दिली. त्याला कायम राखण्यासाठी CSKनं 11 कोटी मोजले. आयपीएलमधून धोनीच्या निवृत्तीनंतर रैनाकडे CSKच्या कर्णधारपदाची माळ जाण्याची शक्यता आहे.13 / 13महेंद्रसिंग धोनी - आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर असला तरी महेंद्रसिंग धोनीचं नाणं अजूनही खणखणीत आहे. चेन्नई सुपर किंग्सनं त्याला संघात कायम राखण्यासाठी 15 कोटी रुपये मोजले आहेत. विराट कोहलीनंतर ( 17 कोटी) संघानं खेळाडूला कायम राखण्यासाठी मोजलेली ही दुसरी सर्वाधिक रक्कम आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications