Join us  

IPL 2020 Schedule Update : दोन लेगमध्ये होणार आयपीएलचे सामने; जाणून घ्या कसं असेल वेळापत्रक!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 10:07 AM

Open in App
1 / 10

इंडियन प्रीमिअर लीगचे ( आयपीएल ) 13वे हंगाम सुरू होण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे, तरीही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून ( बीसीसीआय) वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. 19 सप्टेबंर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती येथे ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे, सध्या क्रिकेट चाहत्यांना एवढेच माहीत आहे.

2 / 10

दुबई आणि अबु धाबी येथे कोरोना व्हायरस संदर्भात वेगवेगळे नियम आहेत. त्यामुळे दोन शहरांमध्ये प्रवास करण्यासाठी नियमांचे पालन करावे लागत आहे. अबु धाबीत प्रवेश करण्यापूर्वी रॅपिड टेस्ट करून घेणं अनिवार्य आहे, रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच सीमा ओलांडण्याची परवानगी दिली जाते.

3 / 10

अशा कठोर प्रक्रिया सामन्याच्या दिवशी अमलात आणणे अवघडच आहे. त्यामुळे बीसीसीआयनं अजूनही वेळापत्रक जाहीर केलेलं नाही.

4 / 10

बीसीसीआय आणि अमिराती क्रिकेट मंडळ यांच्यात लीगच्या वेळापत्रका संदर्भात चर्चा सुरू असून आयपीएलचे सामने दोन लेगमध्ये खेळवण्याचा विचार सुरू आहे. जेणेकरून दोन शहरांमधील प्रवास कमी होईल.

5 / 10

सूत्रांच्या माहितीनुसार 56 लीग सामने खेळवण्यात येतील. त्यापैकी 21 सामने दुबईत, 21 सामने अबु धाबी आणि 14 सामने शाहजाह येथे खेळवण्यात येतील.

6 / 10

शाहजाह ते दुबई अशा प्रवासाला कोणतेही बंधंन नाही. त्यामुळे आयपीएलचा पहिला लेग दुबई आणि शाहजाह येथे खेळवण्याचा विचार बीसीसीआय करत आहे.

7 / 10

आयपीएलचा दुसरा लेग दुबईपासून 130 किलोमीटर दूर असलेल्या अबु धाबीत खेळवण्यात येईल. प्ले ऑफ आणि फायनल ही दुबईत खेळवली जाऊ शकते.

8 / 10

येत्या 48 तासांत पुढील निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल आणि हेमांग आमीन यांच्यासह यूएई सरकारच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पाडणार आहे.

9 / 10

सध्या मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स हे संघ वगळता अन्य सहा संघ दुबईतच आहेत. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स अबु धाबी येथे आहेत. बीसीसीआयनं पहिला लेग दुबईत घेण्याचे ठरवल्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाइट रायडर्सना त्यांचा बेस दुबईत हलवावा लागेल.

10 / 10

53 दिवसांच्या या स्पर्धेतील सायंकाळचे सामने 7.30 वाजता सुरू होतील, तर डबल हेडरचे 10 सामने दुपारी 3.30 वाजल्यापासून सुरू होतील.

टॅग्स :आयपीएल 2020संयुक्त अरब अमिरातीबीसीसीआयमुंबई इंडियन्सकोलकाता नाईट रायडर्सराजस्थान रॉयल्सदिल्ली कॅपिटल्सकिंग्ज इलेव्हन पंजाबरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसनरायझर्स हैदराबाद